Tuesday 24 March 2020

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उध्द्वव ठाकरे यांनी दाखवलेली कामगिरी निश्चित कर्तव्य निष्ठतेची आहे.. विशाल जाधव

Lok hitay news..



दि. 24.मार्च. (लोक हिताय न्युज. प्र )
गेल्या ९ मार्च पासून ते आजपर्यंत कोरोना ने ऊच्छाद मांडला आहे.या प्रकरणी जनतेचे उत्तर दायीत्व म्हणुन वेळोवेळी शासनाने व महाराष्ट्र राज्याचे मुख्य पालक या नात्याने मुख्यमंत्री ऊद्धव ठाकरे यांनी दाखवलेली कामगिरी निश्चितच कर्तव्य निष्ठतेची आहे." समस्या गंभीर पण शासन खंबीर" त्यांच्या वाक्याने गर्भगळीत झालेल्या मनावर मायेची फुंकर आहे.सुरूवातीला कर्फ्यु व नंतर संचार बंदी सारखे उचललेलं दमदार पावूल आहे.केवळ या दोन घोषणांनी कोरोनाला आळा बसत आहे,सामान्य माणूस मरणापासुन वाचला जातोय.आणी त्यामुळेच व डॉक्टरांच्या अथक परिश्रमाने १२ कोरोना बाधीत मुक्त झाले आहेत.आपल्या दुरदृष्टीच्या धोरणांचा हा परिपाक आहे.आपल्या पदाचा व जनतेच्या विश्वासाचा आपण निश्चीत आदर केला असे वाटते.
आरोग्यमंत्री राजेशभैया टोपे यांनी वेळोवळी पुरवलेली माहीती व दिलेला दिलासा हा बुडत्याला  काडीचा आधार म्हणावेसे वाटते.आपल्या दोघांच्याही मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधिकारी यांनी दाखवलेली कर्तव्य तत्परता आमच्या याच देही याच डोळ्यांनी अनुभवतो आहोत.पोलिस प्रशासनाला तर अंतःकरणा पासून नतमस्तक आहोत. दळणवळणा बाबतीत राज्यबंदी पासुन जिल्हाबंदी , मुख्य शहर बंदी  धार्मिकस्थळाची बंदी सार्वजनिक ठिकाणाची बंदी ही कोरोनाला हद्दपारिची नोटीसच म्हणावी लागेल.हे सर्व आपले कर्तव्य जरी असले तरी आपण दाखवलेली तत्त्परता वाखाणण्याजोगी आहे.पोलिसांनी जप्त केलेले १५ कोटीचे मास्क हे विसरून चालणार नाही.आमच्या पुणे जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी जिल्ह्यंतर्गत केलेल्या उपाययोजना तर थक्क करणा-या आहेत.
एकुणच आपत्कालीन राज्यात करावयाच्या योजना व योजनांचा पाठपुरावा ही महाराष्ट्रातील जनता पाहात आहे.
वाईट याचेच वाटतेय की ९०% जनता आपल्या सुचनांचा पाठपुरावा करत आहेत.पण राहीलेल्या १०% चं काय ? हा खरच मोठा मरणप्रश्न आहे, समोर मरण दिसत असतांना विकलांग मनोवृत्तीच्या नागरिकांबाबत काळजी वाटते.
चांगल्या कामाचं कौतुक का व्हायला नको ,केवळ याच भावनेतून हे व्यक्त करतोय.याला राजकीय भावनेने  कृपा करून पाहु नये ही हात जोडून विनंती.सध्या पोलिस प्रशासनाला खुप त्रास होतो आहे, कुटुंबांपासुन दुर, आंघोळ, नाष्टा, जेवण, व शारीरिक विश्रांती अर्थात झोप या पासुन पुर्णतः वंचीत आहे,कर्तव्य बजावताना त्यांनाही "हायरिस्क" मधून जावे लागते आहे. तरीही ते जिवाची बाजी लावून लढत आहे.संविधानातील "'डायरेक्टव्ह प्रिन्सीपल आँफ स्टेट पाँलिसी ""
चा उपयोग आपणास जाणीव आहे असे वाटते.
महाराष्ट्रातील तमाम जनतेला विनंती आपण सर्वच अत्यंत कठिण परिस्थीतीतुन जात आहोत,यांचे भान ठेवा,अज्ञानापोटी मरणाला मिठी का मारावी? जिवन फार सुंदर आहे ते जगुन पहा.
घरीच थांबा व मरणापासून वाचा रे बाबांनो.अहमदनगर,ठाणे सोलापूर च्या भाजीबाजारात होणा-या  गर्दी बाबत मी बेचैन आहे.
शेवटी राज्याचे मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री, आरोग्य मंत्री, गृहमंत्री, जिल्हाधिकारी, पोलिस प्रशासन,  महानगरपालिकेचे आयुक्त तसेच या कामी मदत करणा-या स्वयंसेवी संस्था,व शासनाच्या आवाहनाला साथ देणारे सुज्ञ नागरिक
यांचे आभार मानन्या पेक्षा या सर्वांच्या ऋणात राहणे मला आवडेल

No comments:

Post a Comment