Saturday 7 March 2020

न्याय. लोया यांच्या मुत्यूची फेरचॊकशी करावी या मागणी साठी बेमुदत अन्नत्याग सत्याग्रह. सुरु अपना वतन कडून

Lok hitay news.






           उपरोक्त विषयान्वये आपणास कळविण्यात येते कि, न्या . ब्रिजगोपाल लोया व संबंधित इतर न्यायाधीशांच्या संशयित मृत्यूची फेरचौकशी करावी याबाबत अपना वतन संघटनेच्या वतीने.
(लोक हिताय न्यूज. प्र. दिलीप देहाडे )दि. २ फेब्रुवारी २०२० व दि. २६ फेब्रुवारी २०२० रोजी मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व मा. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे लेखी तक्रार करण्यात आली होती. परंतु सदर तक्रारी बाबत राज्यशासनाने प्रतिसाद न दिल्याने शनिवार दि. ७ मार्च २०२० रोजीपासून डॉ . बाबासाहेब आंबेडकर चौक ,पिंपरी ,पुणे याठिकाणी अपना वतन संघटनेच्या वतीने बेमुदत अन्नत्याग सत्याग्रह सुरु करण्यात आले आहे.अपना वतन संघटनेच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हंटले आहे कि, न्या .लोया यांच्या मृत्यूबाबत अनेक शंका व प्रश्न उपस्थित होत आहेत . त्यांचा मृत्यू हा नैसर्गिक नसून घातपात असल्याचा दावा त्यांच्या नातेवाईकांनी सुद्धा केला आहे. न्या .लोयांच्या मृत्यूप्रकरणाबाबत देशातील सर्वोच न्यायालयाचे न्ययाधीश ,कायदेतज्ञ ,पत्रकार ,सामाजिक कार्यकर्ते फेरचौकशीची मागणी करीत आहेत . कारण न्या . लोया यांच्या मृत्यूमुळे न्यायसंस्थेंच्या कार्यप्रणालीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. जनतेमध्ये न्यायसंस्थेंबाबत अविश्वास निर्माण होत आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेली न्यायपालिका संशयाच्या भोऱ्यात आल्याने या प्रकरणाची फेरचौकशी होणे आवश्यक आहे.
या सत्याग्रहामध्ये संघटनेचे अध्यक्ष सिद्दीकभाई शेख व पिंपरी चिंचवड शहर कार्यध्यक्ष हमीद शेख उपोषणास बसले आहेत. आंदोलनास शहरातील ५० सामाजिक संघटना व राजकीय पक्षांनी  सुद्धा पाठिंबा दिलेला आहे. सदर आंदोलनास न्या . बी.जी. कोळसे पाटील , ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मानवजी कांबळे ,मा. नगरसेवक मारुती भापकर ,जमियत ए उलेमाये हिंदीचे हाजी गुलजार शेख ,गिरीश वाघमारे  ख्रिश्चन धर्मगुरू सॉलोमन भंडारी यांचे मार्गदर्शन लाभलेले आहे.


       
संघटनेच्या मागण्या :

१) न्या . लोया यांच्या मृत्यूची फेरचौकशी करावी

१) सदर प्रकरणातील साक्षीदारांचे व इतर संबंधित व्यक्तींचे जबाब पुन्हा नोंदविण्यात यावे.

२) निरंजन टकले तसेच राणा अय्युब व याकामी शोध घेणाऱ्या इतर लोकांना संरक्षण पुरवून त्यांचेकडे असलेली माहिती या प्रकरणाच्या तपासात नोंदविण्यात यावी. व त्यांनी मिळवलेले दस्तऐवज पुराव्याकामी दाखल करण्यात यावेत .

३) या प्रकरणात तपास करत असलेल्या अधिकाऱ्यांना व साक्षीदारांना विशेष संरक्षण देण्यात यावे .

No comments:

Post a Comment