Monday, 9 March 2020

. Lok hitay news 


लोक हिताय न्युज. ता २४;- विवाह हा आयुष्याच्या प्रवासात एक प्रमुख व महत्त्वाचा टप्पा असतो.आपल्या आयुष्याचा जोडीदार म्हणजे अशी व्यक्ती ज्याच्या सोबत जन्मभराचे नाते जोडलेले असते.परंतु समाजातील आर्थिक दृष्ट्या दुर्लभ घटकांतील लोकांसाठी लग्न गाठ बांधणे हे वाटते तेवढे सोपे नसते.आपली प्रतिष्ठा जपण्यासाठी हा विवाह सोहळा थाटात करताना, लहान सहान खर्च त्यांच्या आवाक्याबाहेर ठरतात.अशा परिस्थितीत महागाईतही सर्वसामान्यांना आनंद मिळावा याभावनेने माजी नगरसेवक व अनुसूचित जाति मोर्चा प्रदेशचे उपाध्यक्ष विष्णू (आप्पा) नारायण हरिहर यांनी 25 जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले असल्याचे लक्ष्मीकांत हरिहर यांनी सांगितले.आज हॉटेल 360 डिग्री, महाराज रोड, डेक्कन येथे पत्रकार आयोजित परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.
मातोश्री कै. लक्ष्मीबाई नारायण हरिहर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ  मा.  विष्णू  नारायणराव हरिहर यांचे ज्येष्ठ सुपुत्र चि. राहुल विष्णू हरिहर यांचा शुभ विवाह सोहळा गुरुवारी दि. 27 फेब्रुवारी 2020 रोजी दु. 12 वा. सोमनरमन गौडा एन्क्लेव्ह, चंद्रमौळेश्वर सर्कल, रायचूर,कर्नाटक राज्य येथे होणार आहे. या शुभविवाहाचे औचित्य साधून स्वागत समांरभप्रसंगी रविवारी दि. 8 मार्च 2020 रोजी सायं 6 ते 10 वेळेत ‘वर्धमान सांस्कृतिक केंद्र’ आईमाता मंदिराजवळ, गंगाधाम रोड, मार्केटयार्ड पुणे 37 येथे भव्य दिव्य सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी बोलताना विष्णू हरीहर म्हणले,” माझा मुलासोबत इतर 25 मुलामुलींची लग्न थाटामाटात लावून दिली जाणार आहेत.त्यामुळे त्यांच्याही चेहऱ्यावर आनंद पाहताना वेगळेच समाधान पाहायला मिळणार आहे. हे समाधान पैसा संपत्तीमध्ये मिळणार नाही. समाज सेवा करण्याचा आगळ्या वेगळ्या पद्धतीचा मनोदय आहे. यातून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. हे मी माझे भाग्य समजतो. अशा पद्धतीचे विवाह सोहळे होण्याची आज समाजाला गरज निर्माण झाली आहे.मागील काही वर्षापासून महागाई आणि बेरोजगारी प्रचंड वाढले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना लग्न सोहळा सारखा आनंद क्षण अनुभवता येणं कठीण झाला आहे ही गरज ओळखून या उपक्रमामध्ये थोडासा हातभार लावण्याचे ठरवले.
माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते (महा.राज्य )मा. ना. श्री देवेंद्र फडवणीस  व सोलापूरचे खासदार मा. श्री डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या प्रमुख मान्यवर या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.
लग्नावर कोट्यवधी रुपयांची उधळण न करता हरिहर परिवार त्यांच्या  घरातील मुलाच्या विवाहाचा समांरभ या सामुदायिक विवाह सोहळ्यात करत असल्याने समाजाला एक वेगळा आदर्श घालून देत आहे .

No comments:

Post a Comment