Tuesday, 17 March 2020

वैजापूर येथील भीमराव गायकवाड हत्याकांडप्रकरणी पालक मंत्र्यांकडून गँभीर दखल 30 दिवसात चार्जशीट दाखल होणार.. सुभाष देसाई

LOK HITAY NEWS.
लोक हिताय न्युज. दि. 17.मार्च.
औरंगाबाद : मौजे लाख, वैजापूर येथील दलित समाजाचे भीमराव गायकवाड या अल्पवयीन तरुणाच्या हत्याकांड प्रकरणाची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली असून या प्रकरणी रिपब्लिकन युवा मोर्चाच्या वतीने करण्यात आलेल्या सर्वच मागण्यांवर सकारात्मक विचार करण्यात येत असून या प्रकरणी तीस दिवस किंवा त्यापूर्वीच चार्जशीट दाखल करण्यात येईल असे स्पष्ट आश्वासन राज्याचे ज्येष्ठ मंत्री व औरंगाबादचे पालकमंत्री आमदार सुभाष देसाई यांनी रिपब्लिकन युवा मोर्चाचे पक्ष नेते राहुल डंबाळे यांना दिले आहे.

प्रेमप्रकरणाच्या संशयावरून घडलेल्या या हत्याकांडाचा तीव्र निषेध रिपब्लिकन युवा मोर्चाच्या वतीने नोंदविण्यात आला असून याप्रकरणी पालकमंत्री यांचे लक्ष वेधले होते. त्यावेळी पालकमंत्र्यांनी वरील भूमिका स्पष्ट केली आहे. लवकरात लवकर न्याय मिळावा यासाठी मुदतीत चार्जशीट दाखल करून सदर घटना द्रुतगती न्यायालयामार्फत चालवण्यात येणार असून यात विशेष सरकारी वकील म्हणून पुणे येथील एडवोकेट प्रताप परदेशी यांची नियुक्ती करण्याचे तत्वतः मान्यता देण्यात आलेली आहे. तसेच सदर पिढी कुटुंबियांना आर्थिक मदत आजच ताबडतोब देण्याच्या सूचना संबंधितांना केले असल्याचेही देसाई यांनी डंबाळे यांना सांगितले आहे.
दरम्यान राज्य सरकार अशा घटनांच्या बाबतीत अतिशय गंभीर असून या प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत यासाठी सर्व आवश्यक ती पाउले उचलण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

No comments:

Post a Comment