Monday, 30 March 2020

ससून हॉस्पिटलच्या नवीन इमारतीची जिल्हा अधिकारी,, नवलकिशोर राम यांनी पाहणी केली

Lok hitay news.




            पुणे,(लोक हिताय न्युज. प्र. ) दिनांक 30- कोरोनाच्‍या पार्श्‍वभूमीवर ससून हॉस्‍पीटलच्‍या नवीन इमारतीत  5 एप्रिलपर्यंत 50 आयसीयू (इंटेन्सिव्‍ह केअर यूनिट) आणि 100 आयसोलेशन बेड तयार होणार असून या बाबतच्‍या कामांची पहाणी जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम आणि पशुसंवर्धन आयुक्‍त सचिंद्र प्रताप सिंग यांनी केली. यावेळी बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्‍ठाता डॉ. अजय चंदनवाले, कार्यकारी अभियंता निरंजन तेलंग, डॉ. हरीश ताटिया, डॉ. मुरलीधर तांबे यांच्‍यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

            जिल्‍ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होत असल्‍याने खबरदारीचा उपाय म्‍हणून आयसीयू व आयसोलेशन बेड्सची तयारी करण्‍यात येत आहे. ससून हॉस्पीटलची नवीन इमारत अकरा मजली असून सहाव्‍या व नवव्‍या मजल्‍यावर रिफ्यूजी एरिया आहे.  इमारतीतील सर्वच मजल्‍यावर आयसोलेशन बेड्सची सोय करण्‍यात येणार आहे. पशुसंवर्धन आयुक्‍त सचिंद्र प्रताप सिंग यांच्‍याकडे रुग्‍णालय व अतिदक्षता  विभागाचे व्‍यवस्‍थापन ही जबाबदारी देण्‍यात आली आहे. पहाणीनंतर अधिष्‍ठाता कक्षात बैठक घेण्‍यात आली. बैठकीत इमारतीच्‍या इतर अनुषंगिक बाबींच्‍या उपलब्‍धतेवर चर्चा करण्‍यात आली. संपूर्ण इमारतीच्‍या वातानुकुलीन यंत्रणेसाठी नवीन ट्रान्‍सफॉर्मर (जनित्र), जादा व्‍हेंटीलेटर, लॉकडाऊनमुळे उपलब्‍ध मनुष्‍यबळाच्‍या मदतीने गतीने काम करणे यावर चर्चा झाली. कोरोनाच्‍या मुकाबल्‍यासाठी शासनाचे सर्वच विभाग सक्षमपणे काम करत असून नवीन इमारतीत 700 हून अधिक बेड्स तयार करण्‍याचे आव्‍हान पूर्ण करु, असा विश्‍वास यावेळी व्‍यक्‍त करण्‍यात आला.

No comments:

Post a Comment