Monday 23 March 2020

मानव जीवनात जे लोक महत्प्रयासाने स्वकष्टातून आपले अस्तित्व निमार्ण करतात त्या मांदियाळीमध्ये माजी महापौर. हनुमंतराव भोसले यांचे नाव अभिमानाने घयावे लागले.. किशोर गवळी

.Lok hitay news



दि. 23.मार्च. (लोक हिताय न्युज. प्र. ) नेहरूनगर व पिंपरी-चिंचवड शहरात ते "आण्णा"
या आपुलकीच्या नावाने प्रचलित.
राजकीय कारकिर्दीच्या आगोदर भाकरीचा प्रश्न मिटविण्यासाठी त्यांनी दगडखाणीत काम केले,कंपनी कामगार म्हणून नशिब आजमाविले,नागरी प्रश्नांची जान असल्याने लोकआग्रहास्तव त्यांनी १९८६ ची सार्वत्रिक निवडणूक लढविली,त्यात ते विजयी झाले व उद्योगनगरीच्या प्रथम उपमहापौर पदावर विराजमान झाले,एका सर्वसामान्य कामगारांच्या प्रतिनिधीचा तो एक सर्वोच्च सन्मान होता,नंतरच्या काळात महापौर,विरोधी पक्षनेता,विधी समिती सदस्य या पदांवर काम करताना त्यांनी शहरवासियांसाठी काम केले,त्यांच्या महापौर पदाच्या काळात सुरू झालेला गणेश फेस्टिवल,डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुर्णाकृती पुतळ्याची पायाभरणी,श्रीराम लागूंसारख्या विचारवंताचा महापालिकेत त्यांनी केलेला सन्मान,धनराज पिल्ले या हॉकी कर्णधाराचा शरद पवारांच्या हस्ते त्यांनी घडवून आणलेला नागरी सत्कार,हॉकी स्टेडियमची निर्मिती या गोष्टी शहरवासिय विसरू शकणार नाहीत.
माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला भावतो तो आण्णांचा साधेपणा,त्यांच्याबरोबर फिरताना अनेक असे जेष्ठ भेटतात ज्यांनी आण्णांबरोबर काम केलेले असते, त्यांना आण्णा थेट नावाने हाक मारतात व आस्थेवाईकपणे त्यांची व त्यांच्या कुटूंबाची चौकशी करतात,काम करत असतानाच्या आठवणी काढतात.
नेहरूनगर साठी तर आण्णा कुटूंबप्रमुखच,कुणीही निमंत्रण दिल्यास छोटया-मोठया कार्यक्रमांना आण्णा जातीने हजर असतात,नेहरूनगर मधील प्रत्येकाला आण्णा आपल्या घरातीलच एक वाटतात,म्हणून अनेक दशके त्यांनी लोकांचे प्रतिनिधीत्व केले.
आण्णांकडे प्रत्येकाच्या शब्दाला महत्व असते आणि ते कुठल्याही परिस्थितीत तो शब्द पाळतात,मी व्यक्तीश: त्यांच्याकडे विठ्ठलनगर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रवेशव्दार कमानीची मागणी केली असता,त्यांनी नगरसेवक राहुलभाऊ भोसले यांच्या मार्फत पहिल्याच प्रभागसमिती मध्ये ठराव करून घेतला.
आण्णांचे व माझे वैयक्तिक संबंध अनेकवेळा चर्चेचा विषय झाला,काहींना ते रूचलेही नाहीत,पण आण्णा व माझी विश्वासाची नाळ भक्कम होती आणि आजही ती कायम आहे.
आण्णा सदैव सांगतात कि रक्तनात्यापेक्षा विश्वासाचे नाते मोठे असते,त्याप्रमाणे आमच्यात परस्पर विश्वासाचे नाते निर्माण झाले.
आपल्या यशाचे श्रेय बाबासाहेबांना देताना,"बाबासाहेब नसते तर हे यश मिळाले नसते,बाबासाहेबांमुळे मी महापौर झालो." असे ते जाहीर भाषणात सांगतात,बहुजन समाजासाठी कळकळ व्यक्त करतात,शिव-फुले-शाहू-आंबेडकर-आण्णाभाऊ यांच्या विचारांची ते कास धरतात,म्हणून बहुजन समाजात जन्माला येवून त्यांनी असामान्य यश मिळविले म्हणून सबंध बहुजन समाजासाठी आण्णा "बहुजनभूषण"ठरतात.
अशा या बहुजनभूषण,लोकनेत्याचा सर्वसामान्यांच्या आण्णांचा २४ मार्च रोजी वाढदिवस,या वाढदिनी आदरणीय आण्णांना मी वाढदिवसाच्या  हार्दिक शुभेच्छा देतो.
                  

No comments:

Post a Comment