Monday 16 March 2020

अट्रोसिटी घटनेकडे हेतुतः.. दुर्लक्ष केले प्रकरणात पालक मंत्री सुभाष देसाई यांनी राजीनामा द्यावे,. राहुल ढमाळे

Lok hitay news.


लोक हिताय न्यूज. प्र. दि. 16. मार्च.
औरंगाबाद : जिल्ह्यातील वाढत्या जातीय अत्याचाराच्या घटनांकडे हेतुतः दुर्लक्ष करून अत्याचारग्रस्त दलित समाज बांधवांची प्रत्यक्ष भेट घेण्याचे टाळणे तसेच याप्रकरणी दलित समुदायाला दिलासादायक कोणतीही कृती न केल्याप्रकरणी राज्याचे ज्येष्ठ मंत्री तथा औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री श्री सुभाष देसाई यांनी औरंगाबाद जिल्हा पालकमंत्री पदाचा वाढत्या जातिय अत्याचाराच्या घटनांची जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशी भूमिका रिपब्लिकन युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश चे पक्ष नेते राहुल डंबाळे यांनी लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
वैजापूर येथे गायकवाड नावाच्या युवकाचा जातीय कारणातून झालेला निर्घुण खून व यापूर्वी सिल्लोड येथील घटना यामुळे जिल्ह्यातील जातीय अत्याचाराच्या घटनांनी कळस गाठला असून जिल्ह्यातील दलित जनता भयभीत व संतापलेली आहे.

सदर घटनांकडे गांभीर्याने बघून विशेष आढावा बैठक घेऊन अशा घटना घडू नयेत याबाबतचा ठोस कृती कार्यक्रम राबविण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला देणे सेच अत्याचारग्रस्त कुटुंबियांची भेट घेऊन त्यांना दिलासा देणे व या प्रकारच्या घटना घडणार नाहीत याबाबत आश्‍वस्त करणे या नैतिक जबाबदारी पासून पालकमंत्री दूर राहिले असल्याने औरंगाबाद सारख्या जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावर राहण्याचा नैतिक अधिकार यामुळे त्यांनी गमावलेला आहे असेही सदर निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान वैजापूर येथील हत्याकांडप्रकरणी पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्याशी चर्चा झाली असून ॲट्रॉसिटी घटनेतील तरतुदीनुसार एक महिन्याच्या आत चार्जशीट दाखल करण्याची ची मागणी त्यांच्याकडे करण्यात आली असून सदर घटनेत आपण व्यक्तिशः लक्ष घालत असून संपूर्ण तपास आपण बारकाईने करणार असल्याचे आश्वासन पोलीस अधीक्षक यांनी राहुल डंबाळे यांना दिले आहे दरम्यान सततच्या घडणाऱ्या घटनांमुळे अहमदनगर ऐवजी औरंगाबाद जातीय अत्याचाराच्या घटनांची केंद्रबिंदू असणारा जिल्हा होणे हे कोणासही भूषणावह नाही व यास जबाबदार असणाऱ्या सर्व संबंधितांवर कारवाई करावी असा आग्रह डंबाळे यांनी पोलिस अधीक्षक यांच्याकडे झाला आहे.

दरम्यान कोरोना वायरस वातावरण कमी झाल्यानंतर रिपब्लिकन युवा मोर्चाच्या वतीने तात्काळ तीव्र आंदोलनाचे आयोजन या विषयावर औरंगाबाद पोलीस अधीक्षक कार्यालय येथे करण्यात येणार असल्याचेही डंबाळे यांनी जाहीर केले.

No comments:

Post a Comment