Monday, 27 April 2020

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आणखी एक पाऊलपुणे शहर कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांसाठी चार वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱयांची नियुक्ती..

Lok hitay news...







          मुंबई,Lok hitay news.  दि. 27 :-  पुणे शहरातील कोरोना प्रतिबंधक कार्यवाही अधिक प्रभावी व गतिमान करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आणखी एक पाऊल टाकलं असून त्यांच्या निर्देशानुसार श्री.अनिल कवडे, श्री,सौरभ राव, श्री. सचिंद्र प्रतापसिंग आणि श्री.कौस्तुभ दिवेगावकर या चार वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांची पुणे शहरासाठी विशेष नियुक्ती करण्यात आली आहे. पुणे विभागीय आयुक्त आणि पुणे महापालिका आयुक्तांना कोरोनाविरुद्धच्या लढाईत हे अधिकारी सहाय्य करतील.
               राज्याच्या मुख्य सचिव कार्यालयातर्फे आज यासंबंधीचे आदेश जारी करण्यात आले. श्री.अनिल कवडे हे राज्याचे सहकार आयुक्त आहेत. श्री. सौरभ राव यांच्याकडे साखर आयुक्तपदाची जबाबदारी आहे. श्री. सचिंद्र प्रतापसिंग यांच्याकडे पशुसंवर्धन आयुक्त तर, श्री.कौस्तुभ दिवेगावकर यांच्याकडे भूजल सर्व्हेक्षण संचालकपदाचा कार्यभार आहे. हे चारही अधिकारी मूळ जबाबदारी सांभाळून पुणे महापालिका क्षेत्रातील कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांसाठी सेवा देणार आहेत. या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नियुक्तीमुळे पुणे शहरातील कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांची अंमलबजावणी अधिक प्रभावी आणि व्यापक होऊन शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव लवकर नियंत्रणात येण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी प्रयत्न करावे..जिल्हा अधिकारी नवल किशोर राम

Lok hitay news..




पुणे. Lok hitay news.. दिनांक 27- देहू, पुणे आणि खडकी कटक मंडळातील (कॅण्‍टोन्मेंट- छावणी ) नागरिकांमधील कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्‍यासाठी प्रयत्‍न करण्‍यात यावे, असे निर्देश जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिले. खडकी छावणीतील रुग्‍णालयाला आवश्‍यक साधन सामुग्रीसाठी 50 लक्ष रुपये तात्‍काळ मंजूर करण्‍यात आले. 

            संगमवाडी, कसाई मोहल्‍ला, दर्गा वसाहत या भागात कोरोनाबाधित व्‍यक्‍ती आढळून आल्‍यानंतर छावणी मंडळाकडून आवश्‍यक ते उपाय योजण्‍यात आले. या उपायांचा आढावा जिल्‍हाधिकारी राम यांनी घेतला. यावेळी  जिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, पुणे छावणीचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी अमित कुमार, खडकी छावणी मंडळाचे प्रमोदकुमार सिंग, नगरसेविका पूजा आनंद, जिल्‍हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर मिलींद तुंगार, देहू रुग्‍णालयाच्‍या निवासी वैद्यकीय अधिकारी सुनिता जोशी, डॉ. भोसले, डॉ. गायकवाड, अधीक्षक राजन सावंत यांच्‍यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

            देहू, पुणे आणि खडकी कटक मंडळातील (कॅण्‍टोन्मेंट- छावणी ) रुग्‍णालयांच्‍या उपलब्‍ध साधनसामुग्रीचाही जिल्‍हाधिकारी राम यांनी आढावा घेतला. खडकी छावणीतील  रुग्‍णालयाला आवश्‍यक साधन सामुग्रीसाठी 50 लक्ष रुपये तात्‍काळ मंजूर करण्‍यात आले असून आवश्‍यकते नुसार आणखी निधी उपलब्‍ध करुन दिला जाईल, असे जिल्‍हाधिकारी राम यांनी सांगितले.  पुणे छावणी मंडळातील दवाखान्‍यातील साधनसामुग्रीसाठीचा प्रस्‍ताव पाठविण्‍याच्‍या सूचनाही त्‍यांनी संबंधितांना दिल्‍या. या तीनही छावणी मंडळाच्‍या दवाखान्‍यात आयसीयू बेड वाढविण्‍यात यावेत, आवश्‍यकते नुसार पीपीई कीट्स  उपलब्‍ध करुन घेण्‍यात यावेत, घरोघरी जाऊन नागरिकांचे आरोग्‍यविषयक सर्वेक्षण करण्‍यात यावे, असेही त्‍यांनी सांगितले.

            छावणी मंडळातील काही वैद्यकीय अधिकारी रुग्‍णांवर उपचार करण्‍यास नकार देत असल्‍याच्‍या तक्रारीचा उल्‍लेख करुन जिल्‍हाधिकारी राम यांनी नाराजी व्‍यक्‍त केली. डॉक्‍टरांनी आवश्‍यक ती खबरदारी घेवून रुग्णांची वैद्यकीय तपासणी करणे गरजेचे आहे. तथापि, जे डॉक्टर रुग्‍ण तपासणीस नकार देतील त्‍यांच्‍यावर आपत्‍ती नियंत्रण कायदा तसेच इतर कायद्यांतर्गत नियमानुसार कारवाई केली जाईल, असा इशाराही त्‍यांनी दिला.

            खाजगी रुग्‍णालयांनी रुग्णांना भरती करुन त्‍यांच्‍यावर उपचार करावेत. कोणत्‍याही कारणांवरुन रुग्णावर उपचार करण्‍यास नकार देणे चुकीचे आहे,असेही जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम  सांगितले. खाजगी रुग्‍णालयांमध्‍ये कोरोनाच्‍या संशयावरुन रुग्‍णांना भरती करुन घेतले जात नाही, ही बाब दुर्दैवी असल्याचेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले. उपचार नाकारणा-या अशा रुग्‍णालयांवरही नियमानुसार कारवाई केली जाईल, त्‍यांची मान्‍यता रद्द केली जाईल, असा इशारा त्‍यांनी दिला.

Sunday, 26 April 2020

थरारक चार ठिकाणी ब्ररीकेड्सला धडक देत वाट दिसेल तिकडे वेगाने जात होती कार मध नेणाऱ्य कारचा 19 पोलीस वाहनांनी केली सिनेमास्टाईलपाठलाग दोघे ताब्यात....

Lok hitay news...







नाशिक. लोक हिताय न्यूज. जि.  प्र.शांताराम दून बळे  -. दि. 27...रविवारी सायंकाळची वेळ . लाकडाउन सुरू असल्याने नेहमीप्रमाणे शहरात नाकाबंदी सुरू होतो . . एका इंडिका कारमध्ये दोघेजण मद्य होते . पोलिसांच्या नजरेतून हे भामटे नाही . गंगापूर भागात पोलिसांनी ही कार थांबविण्याचा प्रयत्न केला . पण कारचालक थांबेना . यामुळे संशय आणखी बळावल्याने पोलिसांनी पाठलाग सुरु केला . यांनतर गंगापूर , सातपूर , अंबड , इंदिरानगर , निर्भया पथक अशा साना ही बाब लागोपाठ कळवली गेली . या सर्व पोलिस ठाण्याच्या तब्बल १९ वाहनांनी या संशयितांचा सिनस्टाइल पाठलाग केला व अखेर संशयितांना जेरबंद केले . सिनेस्टाइल शहरातील रस्त्यावर चोर - पोलिसांचा हा थरार पाहून अनेकांच्या काळजाचा ठेका चुकला होता . कोणत्याही घटनेत आरोपींना पकडणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान असते . मग त्यासाठी पोलिस आपल्या जीवाची बाजी लावून आरोपी पकडतातच , असाच थरार रविवारी सायंकाळी शहरातील रस्त्यावर दिसून आला . सुरवातीला ज्या नागरिकांनी हे दृश्य पाहिले त्यांच्या काळजाचा ठोकाचःचुकला . शहरात काही विपरीत घटना घडली का ? या संशयाने भीती निर्माण झाली होती . आधीच कोरोनामुळे नागरिक चिंताग्रस्त असताना त्यात पोलिस पाठलाग करत असल्याचे दृश्य दिसल्याने नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा रंगली होती . गंगापूररोडला इंडिका कारमध्ये दोघे मद्याच्या बाटल्या घेऊन निघाले होते . यावेळी नाकाबंदीतील पोलिसांनी कारचालकाला बांबण्यास सांगितले . पण कारचालकाने न थांबता कारचा वेग वाढवला .या बाबीचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी पाठलाग सुरु केला . ही कार सातपूर लिकरोड , अंबड अशा भागातून जात होती . म्हणून गंगापूर पोलिसांनी सातपरला व सातपूर पोलिसांनी अंबड पोलिसांना सतर्क केले . पोलिसांनी तत्काळ रस्त्याचा मागोवा घेत पाठलाग सुरु केला . हा पाठलाग होत असताना इंडिका कारचा चालक इतका वेगात होता कि त्याने चार - पाच ठिकाणी बॅरिकेड्टसला धडक दिली . कारचालक जिकडे रस्ता सापडेल तिकडे पळत होता . लेखानगर , गोविंदनगर , मुबईनाका , उड्डाणपूल , शिवाजी चौक असे करत कारने पांगरे मळा गाठला . या रस्त्याने कारचालकाचाघात केला . कारणयेथे रस्ताच संपला होता . या पाठलागात एक नाही दोन नाही तर तब्बल पोलिस वाहने पाठलाग करत होती आणि अनेक कर्मचारी व अधिकारी धावपळ करत होते . दोन बेजबाबदार नागरिकांमुळे पोलिसांना मोठया प्रमाणात त्रास सहन करावा लागला . अखेर कार ( एम एच ०४ बीएस ३८८१ ) सह सागर विलास जाधव ( २४ , रा . भुजबळ फार्म ) व मोतीराम चिंतामण शेवरे ( २० , रा . शिवशक्ती चौक ) या दोन संशयितांना मद्याच्या बाटल्यांसह गंगापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले .

नाशिक मनपा कडून पंचनाम. नुकसान भरपाई बाबत आज निर्णय आगीत 110.घरे भसमसत 650नागरिक बेघर झाले आहे








.
Lok hitay news..








,         नाशिक.. लोक हिताय न्यूज.  जिल्हा प्र.शांताराम दूनबळे , दि.. 27. एप्रिल..  भद्रकाली परिसरात भिमवाङी झोपडपट्टीत शनिवारी सकाळी लागलेल्या आगीतील नुकसानीचे पंचनामे तातडीने पुणॅ करण्यात आले असून या आगीत ११०घरे भस्मसात झाले आहेत तर जवळपास ६५०नागरिक बेघर झाले असल्याची माहिती समोर आली आहे. या सवाॅना नुकसान भरपाई देण्याबाबत आज दिनांक २७ रोजी निणॅय घेतला जाणार असल्याचे मनपा  सुञाकङुन समजली आहे.                             दरम्यान आपदग्रस्तांना तातडीने आथिॅक मदत देण्याची मागणी शेतकरी कामगार पक्षाचे अॅङव्होकेट मनिष बस्ते  भारतीय कम्युनिस्ट पक्ष  राजू देसले,  सी आय टी यु कामगार संघटना कामगार नेते ङाॅ ङी एल कराङ  राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे अण्णासाहेब कटारे, पिपल्स रिपब्लिकन पक्षाचे गणेश ऊन्हवणे, काॅगेस पक्षाचे लक्ष्मण जायभावे, समाजसेवक देवाभाऊ वाघमारे, भिमा आव्हाङ, संकल्पित रिपाई प्रकाश पगारे, सह विविध स्तरावरील राजकिय सामाजिक कार्यकर्ते यांनी केली आहे.                                         गंजमाळ भद्रकाली परिसरात भिमवाङी हा परिसर मध्यवर्ती   वस्तीतील रहिवासी भाग असुन दाट वस्तीच्या  हया भागात शनिवारी सकाळी  सिलिंडर गॅस गळती ने आग लागली. अनेक घरात सिलिंडरचे स्फोट झाले त्यामुळे परिसरात एकच धावपळ उडाली  .महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रयत्नांची शिकस्त करून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले माञ तरीही अनेक घरे भस्मसात झाली तर साडेसहाशे नागरिक बेघर झाले आहे.              एका पाठोपाठ सिलिंडरचे स्फोट झाल्यानंतर देखील जीवितहानी झाली नाही ही ह्या दुर्घटनेत सुदैवाची बाब ठरली आहे. दरम्यान , आगीच्या घटनेनंतर महापालिकेने संबंधित विस्थापित नागरिकांची जवळच्याच बी . डी . भालेकर मैदान आणि मनपा शाळा क्रमांक सहामध्ये व्यवस्था केली . याशिवाय रविवारची सुटी असल्याने शनिवारीच घाईघाईने सर्व पंचनामे उरकण्यात आले . त्यानुसार ११ घरे आगीच्या भक्ष्यस्थानी पडले असून , ६५० नागरिक बेघर झाल्याचा ' अहवाल सायंकाळी तयार करण्यात आला आहे . जिल्हाधिकारी कार्यालयाशी चर्चा करून या नागरिकांना तातडीने आर्थिक मदत मिळावी यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे महापालिका आयुक्तांनी सांगितले.

इंद्रायणी नगर भागांमधील नगरसेविका नम्रता लोंढे यांचा कष्टकर्‍यांना मदतीचा हात

Lok hitay news..





पिंपरी..(लोक हिताय न्यूज. प्र. दिलीप देहाडे.. ) (26 एप्रिल 2020) : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचा सामना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 3 मे 2020 पर्यंत देशभर लॉकडाऊन केले आहे. त्यामुळे देशभरातील उद्योग व्यवसाय ठप्प झाले आहेत. त्याचा परिणाम पिंपरी चिंचवड उद्योगनगरीत देखील तीव्रतेने जाणवत आहे. शहरामध्ये व एमआयडीसीमध्ये रोजंदारीवर काम करणा-या कष्टकरी कामगारांचे हाल होत आहेत. अनेक कुटुंबांना उपासमारीचा सामना करावा लागत आहे. यासाठी माणुसकीच्या भावनेतून शहरातील अनेक संघटना, संस्था, राजकीय कार्यकर्ते पुढे येऊन गरजू नागरिकांना मदत करीत आहेत. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या इंद्रायणी प्रभागाच्या नगरसेविका नम्रता योगेश लोंढे आणि युवा कार्यकर्ते योगेश लोंढे या दांम्पत्याने भोसरीतील बालाजीनगर, खंडेवस्ती, गवळीमाथा, गणेशनगर या भागामध्ये प्रत्येक कुटुंबांला दोन किलो तांदूळ, व एकूण दहा टन भाजीपाल्याचे वाटप केले आहे. तसेच या परिसरात कर्तव्य बजावत असणा-या पोलिस, सफाई कर्मचारी यांना सॅनिटायझर, पाण्याची बॉटल व मोफत जेवण वाटप केले आहे. मागील आठवड्यात आवश्यक त्या ठिकाणी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने औषध फवारणी करण्यात आली आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने प्रभागामध्ये ज्या ठिकाणी खुली मंडई सुरु करण्यात आली आहे त्या ठिकाणी नागरिकांनी दिलेल्या वेळेत सुरक्षितरीत्या सामाजिक अंतर पाळून, तोंडाला मास्क लावून भाजी खरेदी करावी, अनावश्यक कारणासाठी नागरिकांनी घरातून बाहेर पडू नये. पोलिस, प्रशासन व आरोग्य कर्मचा-यांना सहकार्य करावे. घरात बसूनच आपण कोविड 19 चा सामना करू शकतो. कोणत्याही व्यक्तीस ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे असल्यास जवळच्या महानगरपालिका रुग्णालयात तपासणीसाठी जावे असे आवाहन नगरसेविका नम्रता योगेश लोंढे यांनी केले आहे.




नाशिक शहरातील भीम वाडी गन्जमाळ येथील भीषणआगीत नुकसान झालेल्या कुंटुबीयांना त्वरित मदत करावी आरपीआय कडून... मा छगन भुजबळ यांच्या कडे मागणी

Lok hitay news..





नाशिक.. (लोक हिताय न्यूज. प्र. शांताराम दूनबुळे )*दि. 26.एप्रिल.. कोरोना महामारी च्या संकटाने एक महिन्यापासून संचारबंदी व जमाबंदी असल्याने सर्वच नागरिक आप आपल्या घरांमध्ये बंदिस्त आहेत*.
*नाशिक येथील गंजमाळ वस्तीतील भिमवाडीतील मजूरवर्ग घरीच असल्याने प्रचंड आर्थिक संकटात असतांना या ठीकाणी शनिवार २५ रोजी प्रचंड आग लागून शेकडो लोक बेघर झालेले आहेत.*
*त्यांच्या सर्व  संसारोपयोगी धस्तची राखरांगोळी झालेली आहे घरातील भांडी,कपडे ,अन्न, महत्वाचे कागदपत्रे, पैसे अडका जळुन खाक झाला आहे, महाराष्ट्र सरकारने या घटनेची त्वरित दखल घेऊन आगित होरपळणारया व नुकसान झालेल्या गोरगरिबांना महाराष्ट्र सरकार मार्फत * एका कुटुंबास 2 लाख रुपयांचे आर्थिक मदत देऊन कुटुंबास आधार द्यावा.अशी मागणी ईमेल व्दारे  रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया च्या वतीने जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पुरवठा मंत्री मा.ना. छगनरावजी भुजबळ साहेब यांचे कडे रिपाई चे राज्य उपाध्यक्ष मा. रविंद्रदादा जाधव, राष्ट्रीय उपाध्यक्ष मा.प्रियकीर्ती त्रिभुवन, उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष मा. वसंतरावां वाघ, ग्रा.जिल्हा अध्यक्ष मा.विनोदभाऊ जाधव, जिल्हा कार्याध्यक्ष मा.संजय गायकवाड, निफाड तालुका अध्यक्ष मा.महेंद्र साळवे, जिल्हा उपाध्यक्ष मा. प्रदीपनाना गांगुर्डे, तालुका कार्याध्यक्ष मा.  सुरेश डांगळे, तालुका नेते प्रमोद आहीरे, युवक ता.कार्याध्यक्ष मा. विनोद गायकवाड, तालुका सरचिटणीस मा.प्रमोद शिंदे, उत्तम जाधव, प्रकाश गांगुर्डे, राजु सोनवणे, शशीभाऊ जाधव, आदींनी केली आहे* .
"""""""""""""""""""""""""""""""""""""

Saturday, 25 April 2020

संपूर्ण देशभरातील दुकानदारांना दिलासा आज मध्यरात्रीपासून दुकानचालू राहतील,,,, गृहमंत्र्यांनी काढला आदेश

.लोक हिताय न्यूज... 


दिल्ली,lok hitay news  दि.२५. कोरोना’ला रोखण्यासाठी सध्या संपूर्ण देशात लॉकडाऊन सुरु आहे. मात्र लॉकडाऊनमुळे झालेली आर्थिक कोंडी फोडण्यासाठी केंद्र सरकारने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. २० एप्रिलपासून ग्रीन आणि ऑरेंज झोनमधील नियम शिथिल करण्यात आले होते. त्यानंतर पुन्हा एकदा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
लॉकडाऊनमुळे मागच्या काही दिवसांपासून लॉकडाऊनमुळे दुकाने बंद होती. दुकानं उघडण्यासाठी सरकारनं परवानगी दिल्यामुळे देशभरातील लाखो दुकानदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. देशभरातील दुकाने काही अटींवर उघडण्याची परवानगी केंद्राने दिली आहे.
शुक्रवारी रात्री उशिरा गृहमंत्रालयाने एक आदेश जारी केला आहे. त्यानुसार देशातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये नोंदणीकृत असलेली सर्व दुकाने काही अटींवर सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. या आदेशानुसार राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये दुकानं ही आजपासून सुरू करण्यात येणार आहे.
मात्र या दुकानांची सरकारकडे नोंदणी असणं आवश्यक आहे. हा नियम हॉटस्पॉट असणाऱ्या शहरांना आणि जिल्ह्यांना लागू होणार नाही. तिथे लॉकडाऊनचे नियम कठोरपणे पाळले जाणार आहे. तर मोठे शॉपिंग मॉल, कॉम्प्लेक्स उघडण्यावर स्थगिती कायम ठेवण्यात आली आहे.
दुकाने उघडण्याची सवलत देताना केंद्र सरकारने काही अटी घातल्या आहेत. दुकानात ५० टक्के कर्मचारीच काम करू शकतील. त्यांनी सोशल डिस्टन्सिंगचं काटेकोरपणे पालन करायचे आहे तसेच मास्क व हँड ग्लोव्हज वापरणे बंधनकारक असेल, असे या आदेशात नमूद करण्यात आले आहे

Friday, 24 April 2020

लॉक डाऊन च्या काळामध्ये व्यसनापायी वन वन फिरतात पाई पाई, दारू तंबाखू सिगरेट बीडयासाठी,.. नाशिक

. Lok hitay news....





(नाशिक .दि. 24.एप्रिल.  (लोक हिताय न्यूज. प्रतिनिधी )शांताराम दुनबळे.  )   लॉक डाऊन च्या काळामध्ये कुणी गायछाप देता का गायछाप , असे म्हणण्याची वेळ तंबाखू शौकिनांवर आली असून १० रुपयांची गायछाप ४० रुपये म्हणजे मूळ किमतीच्या चक्क तिप्पट रक्कम देऊनही मिळत नसल्याने गायछाप शौकिनांच्या जिवाची घालमेल सुरू आहे . तर गायछाप इतकी महाग झाल्याने कुणी एक विडाही द्यायला तयार नसल्याने खऱ्या अर्थाने गायछापची किंमत शौकिनांना कळू लागली आहे . गायछाप सोबतच दारूच्या किंमतीही आभाळाला भिडल्याने अनेकांनी दारूचा नादच सोडून दिला आहे . लॉकडाऊन अगोदर गायछाप सह तंबाखूचे इतर प्रकारांची पुडी १० ला मिळत होती , तर बियरचा एक खंबा ६५० ला मिळत होता . मात्र आता सर्वत्र लॉकडाऊन असल्याने गुटखा तंबाखू अन दारूच्या आहारी गेलेल्यांची सद्यस्थितीत तगमग होत आहे . त्यामुळे कितीही महाग असली तरी पाहिजे म्हणजे पाहिजे या पवित्र्याने मिळेल तिथून या वस्तूंची शोधाशोध तळीरामाकडून होतांना दिसत आहे . त्यातच टंचाई निर्माण झाल्याने दहा रुपयाची गायछाप तंबाखू ४० रुपयांपर्यंत ६५० रुपयांचा व्हिस्कीचा खंबा १८०० रुपयांपर्यंत दराने विक्री होत असूनही मोठी मागणीअसल्याचे चित्र आहे . लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवा दुकाने सुरू असल्याने चोरून विकल्या जाणाऱ्या देशी दारू व विदेशी मद्यांचे दर तिपटी चौपटी पर्यंत पोहोचले आहेत . सिगारेट , गुटखा व तंबाखू यांचीही काळ्या बाजारात चढ्या दराने विक्री होत आहे . आता लॉकडाऊनचा कालावधी वाढल्याने तळीरामांच्या जीवाची घालमेल वाढली आहे . आता तर एकच प्याल्यासाठी तळीराम आसुसले आहेत . आर्थिकदृष्ट्या सशक्षम असलेल्यांनी लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या काही दिवसांतच मद्यासह तंबाखूचा पुरेसा साठा करून ठेवला पण आता तोही आटोपला असून ज्यांचे हातावर पोट आहे किंवा अर्थप्राप्ती बेताची आहे , अशा तळीरामांची घालमेल वाढलीआहे . अनेकजण तर एखादी तरी बाटली मिळते का , याचा शोध दिवसभर युद्धपातळीवर घेत आहेत . अनेक विक्रेत्यानी शिल्लक साठ्याचा ताळमेळ साधला असून काळजीपूर्वक विक्री केली जाते . ग्रामीण भागातील दुकानदार तर नियमित ग्राहकांनाच विक्री करत आहेत तर ज्यांना कुठेच मिळत नाही ते मूहमागें दर देत आहेत . गुटखा व सिगारेट शिवाय अनेकांना जेवणही जात नसल्याने विशिष्ट अड्ड्यांवर त्याची सर्रास तिप्पट दराने विक्री होत आहे . अशीच स्थिती तंबाखूची ही असून या भागात लोकप्रिय असलेल्या गायछाप तंबाखूचे दर तर विक्रमी वाढले आहेत . अशा स्थितीतही या व्यसनांसाठी शेकडो रुपये खर्च होत असून त्यातून लाखो रुपयांची उलाढाल होताना दिसतेय .

पुणे विभागात कोरोना बांधीत 1085 रुग्ण.. विभागीय आयुक्त डॉक्टर, दीपक म्हैसेकर यांची माहिती

Lok hitay news...






 
  पुणे . (Lok hitay news. )दि.24
:- विभागातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 1085 झाली असून विभागात 181    कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 831 आहेत. विभागात कोरोनाबाधीत एकुण 73     रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच  38 रुग्ण  गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
  विभागात  1085  बाधित रुग्ण असून 73   रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापैकी पुणे जिल्हयात   985 बाधीत रुग्ण असून 67  रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सातारा जिल्हयात 21  बाधीत रुग्ण असून  2  रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सोलापूर जिल्हयात  41 बाधीत रुग्ण असून 3  रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सांगली जिल्हयात   28 बाधीत रुग्ण असून 1 रुग्णाचा मृत्यू झाला आहे. कोल्हापूर  जिल्हयात   10 बाधीत रुग्ण आहेत.
  आजपर्यंत विभागामध्ये एकूण 12 हजार 755 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते त्यापैकी    12 हजार 86 चा अहवाल प्राप्त आहे.  669 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 10  हजार  939   नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून  1 हजार 85 चा अहवाल पॉझिटिव्ह आहे.
  आजपर्यंत विभागामधील 49 लाख  58 हजार 977  घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून त्या अंतर्गत  1 कोटी 91 लाख 16 हजार 464  व्यक्तींची तपासणी केली आहे. त्यापैकी 989  व्यक्तींना  अधिक तपासणीसाठी संदर्भीत करण्यात आले आहे.
                                 

राज ग्रहावरून आलेल्या आदेशाने येवला शहरांमध्ये भारतीय बौद्ध महासभा भारिप-बहुजन महासंघाच्या कार्यकर्त्यांनी अपंगांना भाजीपाला व किराणा वाटप करण्यात आले

.Lok hitay news..





 येवला,(.लोक हिताय न्यूज. प्र. शांताराम दूनबळे.)  दि. 24.एप्रिल..कोरोना संसर्गा च्या संकटात गरजू गरिबाला  भारतीय बौद्धमहासभा व भारीपच्या वतीने येवला शहरात अपंगांना भाजीपाला व किराणा वाटप नाशिक.  भारतीय बौद्ध महासभा राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय मीराताई आंबेडकर कार्याध्यक्ष आदरणीय भीमरावजी आंबेडकर यांच्या आदेशाने येवला मुक्तीभूमी या ठिकाणी भारतीय बौद्धमहासभा व भारीपच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून सोशल डिस्टन्सच्या नियम व शिस्तीचे पालन करून कोरोनाच्या पार्वभूमी वर देशातील लॉकडाऊनच्या दुसऱ्या टप्प्यात कोरोनाचा कहर सुरू असताना अनेक सर्वसामान्यांचे रोजगार बडाल्यामुळे उदरनिर्वाहाचे प्रश्न निमार्ण झालेले आहेत , हवालदिल झालेल्या सर्वसामान्य जनतेच्या तोंडचे पाणी पळाले असून ऐन उन्हाळ्या हंगामात प्रखर उन्हाचा कहर आणि अशातच सर्वसामान्यांसोबत दिव्यांगावरसुद्धा अक्षरशः उपासमारीची वेळ निर्माण होण्याची परिस्थिती येऊन ठेपली आहे . हातावर पोट असणारे मोलमजुरी करणारे ,छोटे गृहउद्योग करणारे घरेलू कामगार मजूर बेरोगारीच्या सावटाने हताश झाले आहेत . अशातच कुटुंबातील अंध , अपंग गरजूंना सांभाळणे जिकरीचे झाले असतांना परिस्थितीचे गांमभिर्य लक्षात घेऊन येवला शहरातील अशा गरजू दिव्यांगांना भाजीपाला व किराणा वाटप करून आधार दिला आहे . कोरोनाचे महायुद्ध जिंकण्यासाठी स्वच्छतेचे महत्व पटवून देत मानवीमूल्य जोपासण्याची नैतिक जबाबदारी उचलली आहे . कोरोनाला हरविण्यासाठी घरीच राहणे हा एकमेव जालीम उपाय उरला असताना ओढवलेल्या सध्यपरिस्थितीवर मात करण्यासाठी येवला तालुका व शहरातील अनेक सेवाभावीवृत्तीचे समाजसेवक तसेच सेवाभावी संस्था पुढेयेऊन अन्नदान व किराणा , रेशन वाटप करत आहेत हातावर पोट असणाऱ्या गरजूंना मदत करत आहेत ह्या सर्वांचे कौतुक करत आंबेडकरी चळवळीच्या वतीने मानवीहीतासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व बांधवांचे आभारही व्यक्त करण्यात आले . अंध , अपंगांना भाजीपाला व किराणा वाटपासाठी भारतीय ' भाऊसाहेब जाधव , भारीपचे | तालुका अध्यक्ष भाऊसाहेब अहिरे , नवचेतना अॅकॅडमीचे संचालक प्रा . जितेश पगारे . . भाऊसाहेब झाल्टे , अमोल पगारे , कडूभाऊ गरुड , दीपक गरुड , अमित भावसार , सलिम काझी या सर्व कार्यकत्यांनी पुढाकार घेऊन लॉकडाऊन । काळात मदतीसाठी एक पाऊल

Thursday, 23 April 2020

राज्यात स्वस्त धान्यदुकानात सुरळीत धान्य वाटप करावे. अन्यथा कारवाई करून परवाना रद्द करण्यात येईल,, मा. छगन भुजबळ

लोक हिताय न्यूज...








 नाशिक. Lok hitay news.( प्र. शांताराम दूनबळे ).दि 23.एप्रिल.. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाऊनच्या काळात राज्यातील एकही नागरिक उपाशी  राहता कामा नये यासाठी राज्याच्या अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागावर जोखमीची जबाबदारी आहे. या काळात नागरिकांना अन्न धान्य वाटपाची जबाबदारी स्वस्तधान्य दुकानदारांवर असून रेशन धान्य वाटप करतांना अनियमितता तसेच नियमांचे पालन न केलेल्या दि.१९ एप्रिल २०२० पर्यंत राज्यातील एकूण ३९ रेशन दुकानदारांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून ८७ रेशन दुकानांचे निलंबन करण्यात आहे तर एकूण ४८ रेशन दुकानांचे परवाने रद्द करण्यात आले आहे. तसेच यापुढेही स्वस्तधान्य दुकानांमध्ये काळाबाजार, वाटप करतांना कमी धान्य देणे किवा जास्त पैसे घेणे तसेच नियमांचे पालन केले जात नसेल तर कडक कारवाई करण्यात येईल अशी माहिती राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री ना.छगन भुजबळ यांनी दिली आहे.*

राज्यात एकूण सहा महसुली विभाग असून यामध्ये नागपूर, अमरावती,औरंगाबाद, नाशिक, पुणे व कोकण विभागाचा समावेश आहे. या सहाही विभागात लॉकडाऊनच्या काळात एकूण एकूण ३९ रेशन दुकानदारांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून ८७ रेशन दुकानांचे निलंबन करण्यात आहे तर एकूण ४८ रेशन दुकानांचे परवाने रद्द करण्यात आले आहे. राज्यातील या वितरण व्यवस्थेवर अन्न,नागरी पुरवठा विभागाच्या वतीने काटेकोरपणे लक्ष ठेवण्यात आले असून निर्माण करण्यात आलेल्या पथकांच्या माध्यमातून ही कारवाई करण्यात येत आहे.

राज्याच्या नागपूर महसूल विभागात एकूण ५ गुन्हे नोंदविण्यात आले असून १८ रेशन दुकानांचे निलंबन तर १ दुकानाचा परवाना रद्द करण्यात आला आहे. नागपूर विभागात चंद्रपूर जिल्ह्यात सर्वाधिक ११ दुकानांवर निलंबित करण्याची कार्यवाही झालेली असून त्या खालोखाल वर्धा ४ दुकानांवर कार्यवाही झालेली आहे. रेशन दुकान रद्द केल्याची एकमेव कार्यवाही नागपूर शहर भागात करण्यात आली असून चंद्रपूर जिल्ह्यात सर्वाधिक ४ गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

अमरावती महसूल विभागात एकूण ५ गुन्हे नोंदविण्यात आले असून ७ रेशन दुकानांचे निलंबन करण्यात आले तर १३ दुकानांचा परवाना रद्द करण्यात आला आहे. अमरावती विभागात अकोला जिल्ह्यात सर्वाधिक ३ दुकानांवर निलंबित करण्याची कार्यवाही झालेली असून ५ दुकानांचे परवाने रद्द करण्याची कार्यवाही वाशीम जिल्ह्यात करण्यात आलेली आहे. तर त्या खालोखाल बुलढाणा जिल्ह्यात ४ दुकानांचे परवाने रद्द करण्यात आले आहे. यामध्ये सर्वाधिक प्रत्येकी २ गुन्हे अमरावती व अकोला जिल्ह्यात दाखल करण्यात आलेले असून त्या खालोखाल बुलढाणा जिल्ह्यात १ गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

औरंगाबाद महसूल विभागात २९ रेशन दुकानांचे निलंबन करण्यात आले असून ४ दुकानांचा परवाना रद्द करण्यात आला आहे. औरंगाबाद जिल्ह्यात बीड जिल्ह्यात सर्वाधिक १२ रेशन दुकानांवर तर त्या खालोखाल उस्मानाबाद जिल्हात ५ रेशन दुकानांवर निलंबनाची कार्यवाही झालेली आहे. तसेच जालना आणि बीड जिल्ह्यात प्रत्येकी २ रेशन दुकानांचे परवाने रद्द करण्यात आले आहे.

नाशिक महसूल विभागात एकूण १६ गुन्हे नोंदविण्यात आले असून ९ रेशन दुकानांचे निलंबन करण्यात आले तर १५ दुकानांचा परवाना रद्द करण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्यात नाशिक व जळगाव जिल्ह्यात प्रत्येकी ३ दुकानांवर निलंबनाची कार्यवाही करण्यात आली आहे. जळगाव जिल्ह्यात ७ तर त्या खालोखाल नाशिक जिल्ह्यात ४ रेशन दुकानांचे परवाने रद्द करण्यात आले आहे. तसेच अहमदनगर व जळगाव जिल्ह्यात प्रत्येकी ७ रेशन दुकानदारांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

पुणे महसूल विभागात एकूण ४ गुन्हे नोंदविण्यात आले असून १७ रेशन दुकानांचे निलंबन करण्यात आले असून १४ दुकानांचा परवाना रद्द करण्यात आला आहे. पुणे विभागात सर्वाधिक पुणे जिल्ह्यात ११ दुकानांवर निलंबनाची कार्यवाही करण्यात आली आहे. तर कोल्हापूर जिल्ह्यात ८ रेशन दुकानदारांचे परवाने रद्द करण्यात आले असून पुणे जिल्ह्यात ३ दुकानदारांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.


कोकण महसूल विभागात एकूण ९ गुन्हे नोंदविण्यात आले असून ७ रेशन दुकानांचे निलंबन करण्यात आले आहे. तर १ दुकानाचा परवाना रद्द करण्यात आला आहे. कोकण विभागात सर्वाधिक ठाणे जिल्ह्यात ४ रेशन दुकाने निलंबित करण्यात आले रत्नागिरी जिल्ह्यात १ रेशन दुकानाच परवाना रद्द करण्यात आला आहे. तसेच ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक ४ गुन्हे तर त्या खालोखाल रायगड जिल्ह्यात ३ दुकानदारांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

घाबरू नका मात्र काळजी घ्या सर्वांच्या सहकार्याने कोरोनाची साखळी तोड्याची,,, जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांचे आव्हान

लोक हिताय न्यूज..





पुणे( Lok hitay news ),दि..२३..सध्या आपण मोठ्या प्रमाणात टेस्ट करीत आहोत,त्यामुळे  कोरोनाबाधितांची संख्या वाढताना दिसत आहे.घाबरून जाण्याचे कारण  नाही,परंतु काळजी घेणे आवश्यक आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाने कडक धोरण अवलंबविले आहे.अशा प्रसंगी आपण सर्वांनी सहकार्य करावे,असे आवाहन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केले आहे.
     वाढती रुग्ण संख्या बघून घाबरू नका.यावर आपण निश्चित मातकरू असे,असा विश्वास व्यक्त करुन जिल्हाधिकारी राम म्हणाले,पुरूषांच्या बरोबरीने महिलांची संख्या दिसून येत आहे.ही चिंतेची बाब आहे.त्यामुळे कामाशिवाय घराबाहेर पडू नका.पुण्यासाठी हा कठीण काळ आहे.सोशल डिस्टन्सिंगचे पालन करा.जीवनावश्यक वस्तू एकाचवेळी आणून घ्या.वारंवार वस्तू आणायला बाहेर जाऊ नका.
   सर्दी,ताप,खोकला,थकावट व भूक लागत नसेल तर तातडीने महापालिकेच्या फ्ल्यू हाॕस्पिटलमध्ये जाऊन डाॕक्टरांना दाखावा.आजार अंगावर काढू नका किंवा लपून ठेऊ नका.वेळेवर उपचार मिळाले,तर रुग्ण बरे होतात,असे आवाहनही त्यांनी केले आहे.
   पुणे व पिंपरी चिंचवड हे महानगर क्षेत्र शासनाने  प्रतिंबंधित क्षेत्र  म्हणून घोषित केले आहे.भाजीपाला देखील कांही दिवस नागरिकांना मिळणार नाही.
    तसेच उद्योजकांनी कामगारांची  व्यवस्था तेथेच करावी.त्यांना अजिबात बाहेर जाता येणार  नाही.त्यासाठी सहकार्य आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
   शेतकऱ्यांना आवाहन करताना ते म्हणाले,शेतकऱ्यांनी सुध्दा काळजीपूर्वक शेतीची कामे करावीत. ग्रामीण भागातही कोरोनाची लागण झाली.बिनधास्त राहू नका.काळजी घ्या,असे आवाहनही जिल्हाधिका-यांनी केले आहे.

Wednesday, 22 April 2020

जिल्हाधिकारी कार्यालयाकडू 300000 ट्रिपल लेअर सर्जिकल मस्कची खरेदी पहिल्या टप्प्यात 42 हजार मास्कचे वितरण.. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची माहिती

Lok hitay news


.


            पुणे )(लोक हिताय न्यूज. प्र.)  दि.22:- कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने तीन लाख ट्रिपल लेअर सर्जिकल अल्ट्रासोनिक मास्क खरेदी करण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी  नवल किशोर राम यांनी दिली आहे.

    पुणे पोलीस आयुक्त कार्यालयासाठी दहा हजार मास्क, तर पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कार्यालयासाठी सात हजार मास्क तसेच पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण कार्यालयाला दहा हजार मास्क वितरीत करण्यात येणार आहेत. याबरोबरच सर्व तहसिलदार कार्यालयांना प्रत्येकी एक हजार प्रमाणे पंधरा हजार मास्क वितरीत करण्यात येणार आहेत.

 पहिल्या टप्यात एकुण 42 हजार मास्क वितरीत करण्यात येत आहेत.  उर्वरित मास्क टप्याटप्याने सर्व संबंधित यंत्रणांना वितरीत करण्यात येतील, असेही जिल्हाधिकारी श्री. राम यांनी सांगितले.

Tuesday, 21 April 2020

कोविड संम्पल तपासणी होणार जलदगतीने., विभागीय आयुक्त डॉक्टर दीपक म्हैसेकर

Lok hitay news..







पुणे (लोक हिताय न्यूज. प्र. )दि.21 : -  सध्या वाढत जाणा-या कोरोना बाधित रुग्णांची सॅम्पल तपासणी जलदगतीने होण्यासाठी डायना फिल्टर्स या कंपनीने कोविड सॅम्पल कलेक्शन बूथ हे उपकरण विकसीत केले असून ससून हॉस्पीटलमध्ये कार्यान्वीत करण्यात येणार आहे. या नाविण्यपूर्ण उपकरणाची विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी पाहणी केली.
या उपकरणामुळे पीपीई किटसचा वापर न करताही सॅम्पल कलेक्शन करता येऊ शकेल. त्यामुळे कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त सॅम्पल टेस्टींग घेता येतील. अशी माहिती या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक अभिजीत येमुल यांनी दिली.
यावेळी पाहणी करताना विभागीय आयुक्त डॉ.म्हैसेकर यांनी यामध्ये काही सुधारणा सुचविल्या. हे उपकरण निश्चितच उपयोगी राहील, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. यावेळी उपजिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख, मुख्य अभियंता सदाशिव साळुंखे उपस्थित होते.

Monday, 20 April 2020

आदित्य बिर्ला हॉस्पिटल कडून अडीच लाख रुपये माफ करून तब्बल आठ तासानंतर मृतदेह ताब्यात घेतला,, उमेश चव्हाण यांच्या संघर्षातून

Lok hitay news






 चिंचवड -(लोक हिताय न्यूज. प्र).   दि. १९ एप्रिल २०२०- लॉकडाऊनचा काळ - कोरोनाचं थैमान* मार्केट बंद पैसे आणायचे कुठून?? पैसे देणार कोण ??
श्रीमंत दशरथ जाधव, वय - ५६, रा. निगडी यांचं रविवारी १९ एप्रिल २०२० रोजी दीर्घ आजाराने चिंचवड जवळील थेरगाव येथील आदित्य बिर्ला हॉस्पिटलमध्ये सकाळी ९ वाजता निधन झालं..  ३ दिवस उपचारांचं  बिल होतं २ लाख ७२ हजार रुपये. बँक बॅलन्स नाही. जवळील मित्रांकडे पैसे नाहीत. वडील गेल्याच्या दुःखाने आभाळ फाटलं होतं आणि अडीच लाख रुपये बिल बघून पायाखालची जमीन सरकली होती. त्यात लॉकडाऊनच्या नियमामुळे नातेवाईक येऊ शकत नाहीत. सोन्या चांदीची दुकाने उघडी असती तरी दागिने तरी असायला हवेत ना ? पैसे जमवण्याचा कोणताच पर्याय नाही. अश्या परिस्थितीत निगडितील संतोष धंदर हा युवक कार्यकर्ता मला सातत्याने फोन करत होता. मित्राचे वडील वारले आहेत. अडीच लाख रुपये भरल्याशिवाय डेडबॉडी देतच नाहीत, हे सांगत होता. आपल्या रुग्ण हक्क परिषदेच्या कार्यकर्त्याना तरी तिथे कसे पाठवावे? सद्यस्थितीत पुणे - पिंपरी चिंचवड मध्ये घरी बसेल त्याचंच भलं आहे, अशी परिस्थिती! दुपारी १ वाजता त्याचा अकरावा फोन आल्यावर त्याला म्हटलं मी येतो काळजी करू नका! आणि गर्दीही करू नका... घरातून गाडी काढली. मी आणि ऍड. वैशालीताई चांदणे निघालो सोबत पियुषला घेतलं.... हॉस्पिटलमध्ये एकही निर्णय घेणारा अधिकारी नाही म्हणून अर्धा तास गेला... या काळात सह-धर्मादाय आयुक्त श्री नवनाथ जगताप आणि सहाय्यक पोलीस आयुक्त श्री. श्रीधर जाधव यांना फोनवर परिस्थिती सांगितली. तोपर्यंत रुग्ण हक्क परिषदेचे स्वतः उमेश चव्हाण आणि ऍड. वैशाली चांदणे आदित्य बिर्ला हॉस्पिटलमध्ये आल्याची बातमी चांगलीच पसरली होती.
    चक्रे वेगाने फिरली तेथील पुनीतकुमार हे अधिकारी रविवार सुट्टी असताना तातडीने उपस्थित झाले. आणि अडीच लाख रुपयांचे बिल माफ करून लगेचच डिस्चार्ज कार्ड बनवून मृतदेह ताब्यात दिला. मृतकाच्या कुटुंबातील लोकांना अश्रू अनावर झालेच होते. रडता रडता म्हणाले साहेब सगळ्यांना फोन केले. पोरं निवडणुकीत ज्याच्या मागे फिरले त्यांना फोन केले. नातेवाईकांना - नगरसेवकांना सर्वांना फोन केले. कुणीच आलं नाही. सगळे म्हणत होते घराबाहेर पडता येत नाही, येता येत नाही म्हणून....
      तुम्हाला खूप आशीर्वाद लागतील ! शर्टाच्या कॉलरने - तळहातानेडोळ्यांच्या कडा पुसतनाही हात जोडून ते लोक ऍम्ब्युलन्सकडे वळाले. तेथील सामाजिक कार्यकर्ता संतोष धंदरने झालेल्या मदतीविषयी आभाराचे पत्र देऊन फोटो काढण्याची विनंती केली.... रुग्ण हक्क परिषदेचे सगळेच कार्यकर्ते क्रियाशील आहेत.मात्र लॉकडाउनमुळे थेट हॉस्पिटलमध्ये जाऊन मदत करणं मला गेल्या दिडवर्षात जमलंच नव्हतं!! आशीर्वादाची कमाई आणि पुण्याईचा संचय जमा करून पुण्याकडे गाडी वळवली.
     *- उमेश चव्हाण, अध्यक्ष - रुग्ण हक्क परिषद*

नाशिक शहरात भाजपचे पदाधिकारी कडून पत्रकारस ठार मारण्याची धमकी. मुळे... नाशिक शहरात पत्रकार संघाकडून जाहीर निषेध

  Lok hitay news 




नाशिक, लोक हिताय न्यूज. प्र. शांताराम दूनबळे..दि.  २० एप्रिल: शहरातील सिडको नवीन नाशिक परिसरातील शिवशक्तीनगर भागात प्रभाग २६ येथे स्वस्त धान्य दुकान येथे नागरिकांना मोफत धान्य वाटप चालू असताना त्या ठिकाणी नगरसेविका भाजपच्या अलका आहिरे उपस्थित होत्या.
स्वस्त धान्य हे शासनाच्या अंत्योदय, केशरी, बीपीएलच्या योजनातुन मिळत असताना लोकप्रतिनिधी उपस्थित रहात असल्याने दैनिक सकाळचे प्रतिनिधी प्रमोद दङंगव्हाळ यांनी “आयजीच्या जीवावर बायजी उदार” या मथळ्याखाली सोशल मिङीया वर वृत्त प्रसिद्ध केले हे वृत्त शहरात व्हायरल झाल्याने नगरसेविका पती भाजपाचे जबाबदार पदाधिकारी कैलास आहिरे यांनी पञकार प्रमोद दङंगव्हाळ यांना शिवीगाळ व ठार मारण्याची धमकी दिली व सिडको परिसरात दिसला तर तुला बघतो अशी धमकी दिली.
हा प्रकार घडल्या नंतर पञकार दङंगव्हाळ यांनी अबंङ पोलीस स्टेशन ला तक्रार दाखल केली. यावेळी नाशिक पोलीस आयुक्त विश्वास नागरे पाटील यांनी पोलीस स्टेशनला भेट देऊन त्याच्या आदेशानुसार अबंङ पोलीस उप आयुक्त विजय खरात व सहायक पोलिस आयुक्त मंगलसिग सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली अबंङ वरीष्ठ पोलीस निरीक्षक कुमार चौधरी यांनी पञकार संरक्षण कायदान्वे गुन्हा दाखल करण्यातआला असुन भा द वी पञकार सरंक्षण कायदा कलम ५०७ नुसार अटक करण्यात आली आहे. यावेळी दैनिक् लक्ष प्रतिनिधी शेगावकर, महाराष्ट्र राज्य पञकार संघ जिल्हा अध्यक्ष लक्ष्मण ङोळस, भारतीय पञकार महासंघ जिल्हा अध्यक्ष अभि पगारे, शोधांश पञकार ङाॅ राजेश साळुंके, आवाज न्युज रिपोर्टर भारतीय पञकार महासंघ नाशिक शहर अध्यक्ष शांताराम दुनबळे, सह सिडको परिसरातील पञकार प्रतिनिधी उपस्थित होते.
यावेळी या घडलेल्या घटनेचा जाहीर निषेध करून कोणत्याही राजकीय क्षेत्रातील लोकप्रतिनिधी पदाधिकारी यांनी पञकार, वाताॅहर,सोशल मिङीया पञकार, याना दमबाजी, धमकी दिल्यास अशा लोकांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी उपस्थित पञकार यांनी केली

Friday, 17 April 2020

पुणे विभागात कोरोना बाधित एकूण 586रुग्ण.. विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर.

Lok hitay news

     


   पुणे (लोक हिताय न्यूज. प्र.)  दि.17:- विभागातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 586 झाली आहे. तथापी ॲक्टीव रुग्ण 468 आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
            विभागात आतापर्यंत एकूण 586 कोरोना बाधित रुग्ण असून एकूण 50 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच एकूण 68 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे.
 पुणे जिल्हयात 531 बाधीत रुग्ण आहे तर 47 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सातारा जिल्हयात 11 बाधीत रुग्ण असून 2 रुग्णांचा मृत्यू  झाला . सोलापूर जिल्हयात 12 बाधीत रुग्ण आढळून आले असून एका रुग्णाचा मृत्यू झाला. सांगली 26 बाधीत रुग्ण, कोल्हापूर जिल्हयात 6 बाधीत रुग्ण आहेत.
नमुना तपासणी अहवाल
आजपर्यत  विभागामध्ये एकुण  7 हजार 289 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 6 हजार 937 चा अहवाल प्राप्त आहे. तर 386 नमुन्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 6 हजार 306 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 586 नमुन्यांचा अहवाल  पॉजिटिव्ह आहे.
*विभागातील घरांचे सर्व्हेक्षण*
           आजपर्यंत विभागामधील 37 लाख 41 हजार 075 घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून त्याअंतर्गत 1 कोटी 43 लाख 58 हजार 694 व्यक्तींची तपासणी केली आहे. त्यापैकी 807 व्यक्तींना अधिक तपासणीसाठी संदर्भीत करण्यात आले आहे.
    आजपर्यंत विभागात एकूण 5 हजार 660 नागरिकांना निरिक्षणाखाली होम क्वारंटाईन करण्यात आले आहेत. त्यापैकी पुणे जिल्ह्यात 4 हजार 227, सातारा जिल्ह्यात 274, सोलापूर जिल्ह्यात 991, सांगली जिल्ह्यात 167 आणि कोल्हापूर जिल्ह्यात 01 नागरिकांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.
*संस्थात्मक क्वारंटाईन*
आजपर्यंत विभागात एकूण 2 हजार 310 नागरिकांना निरिक्षणाखाली संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आले आहेत. त्यापैकी पुणे जिल्ह्यात 244, सातारा जिल्ह्यात 135, सोलापूर जिल्ह्यात 653, सांगली जिल्ह्यात 81 आणि कोल्हापूर जिल्ह्यात 1 हजार 197 नागरिकांना संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आले आहे,असेही डॉ.म्हैसेकर यांनी सांगितले.

Thursday, 16 April 2020

ररशनिंगचं धान्यवाटप सुरळीत विनातक्रार होण्यासाठी पालकमंत्र्यांनी व्यवस्थितलक्ष घालून जबाबदारी घ्यावी,, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पालकमंत्र्यांना आव्हान

Lok hitay news.






मुंबई, (लोक हिताय न्यूज. प्र. )दि. 17 :- कोरोना संकटकाळात गोरगरीब जनतेला रेशनदुकानांतून दिल्या जाणाऱ्या धान्यवाटपाचं प्रमाण वाढवण्यात आलं आहे, या वाटपात गैरप्रकार होऊ नये, धान्यवाटप सुरळीत, विनातक्रार व्हावं, वाटपाबाबत कुठलीही तक्रार आल्यास तीचं तात्काळ निराकरण करावं आणि शासनाची विनाकारण होणारी बदनामी टाळावी, यासाठी सर्वं पालकमंत्र्यांनी आपापल्या जिल्ह्यात व्यक्तीश: लक्ष घालून जबाबदारी घ्यावी, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्व जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांना पत्र लिहून केलं आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्व पालकमंत्र्यांना पत्र लिहून रेशनदुकानांमधून पुरेसं अन्नधान्य उपलब्ध केलं जात असतानाही तक्रारी वाढत असल्याकडे लक्ष वेधलं आहे. शासनाने रेशनिंगसाठी उपलब्ध केलेल्या धान्यसाठ्याची माहितीही त्यांनी पत्रात दिली आहे. उपमुख्यमंत्री त्यांच्या पत्रात म्हणतात की, राज्यातील रेशनिंगवरील अन्नधान्याचा कोटा 3.87 लाख मेट्रीक टनांवरुन 7.74 लाख मेट्रीक टनांवर नेण्यात आला आहे. केसरी कार्डधारकांना 1.52 लाख मेट्रीक टनांचं अतिरिक्त धान्य उपलब्ध करुन देण्यात आलं आहे. गरीब नागरिकांना पुरेसं धान्य मिळावं, धान्याचं, सुरळीत वाटप व्हावं, कुणीही उपाशी राहू नये, कुणाचीही तक्रार राहू नये याकडे लक्ष देण्याची गरज आहे. त्यासाठी सर्वंच पालकमंत्र्यांनी आपापल्या जिल्ह्यात व्यक्तीश: लक्ष घालावं आणि अन्नधान्य वाटपातील तक्रारी दूर करण्याची जबाबदारी घ्यावी.
राज्यातील कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर शासकीय यंत्रणा सर्वस्तरावर उत्तम काम करत असल्याचं सांगून उपमुख्यमंत्र्यांनी यंत्रणेचं कोतुक केलं आहे. राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा विभागामार्फत 7 कोटी नागरिकांना तीन महिन्यांसाठी 2 रुपये प्रतिकिलो दराने गहू आणि 3 रुपये प्रतिकिलो दराने तांदूळ रेशन दुकानांवरुन देण्यात येत आहे. केंद्र सरकारकडून जाहीर झालेल्या 5 किलो मोफत तांदळाचं वाटपही सुरु आहे. ज्यांच्याकडे केशरी कार्ड आहे त्यांच्यासाठी 8 रुपये प्रतिकिलो दराने गहू आणि 12 रुपये प्रतिकिलो दराने तांदूळ वाटपाचा निर्णय घेतला आहे. राज्यात सर्वत्र धान्यवाटप सुरु असून काही जिल्ह्यांमधून येणाऱ्या तक्रारींमुळे शिधावाटप यंत्रणेची, शासनाची नाहक बदनामी होत आहे. ही बदनामी टाळली पाहिजे. त्यासाठी आपापल्या जिल्ह्यातील शिधावाटप यंत्रणेत गैरप्रकार होणार नाहीत याची काळजी घ्यावी. गरीबांना त्यांच्या हक्काचं अन्नधान्यं सुरळीत व विनातक्रार मिळेल  हे सुनिश्चित करावं. संबंधित पालकमंत्र्यांनी यात व्यक्तीश: लक्ष घालावे, अशी आवाहनवजा विनंती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्व पालकमंत्र्यांना केलं आहे.
शिधावाटप यंत्रणेसंदर्भातील सूचना व तक्रारींसाठी राज्य शासनाने राज्यस्तरावर 1800224950 आणि 1967 हे टोलफ्री दूरध्वनी क्रमांक दिले आहेत. त्यावर संपर्क साधून सूचना द्याव्यात, तक्रारी दूर कराव्यात, असंही त्यांनी पत्रात म्हटलं आहे. 

Tuesday, 14 April 2020

पद्मश्री डॉक्टर मिलिंद कांबळे अध्यक्ष असलेली डिक्की संस्था बेघर नागरिकांच्या मदतीला हात

Lok hitay news..





                                               
  पुणे (लोक हिताय न्यूज. प्र.)  दि. 14 : - कोणताही नागरिक अन्नापासून वंचित राहता कामा नये, या जिल्हा प्रशासनाच्या आवाहनास विविध संस्था, सामाजिक संघटना आणि दानशूर व्यक्तिंनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.यामध्ये
पद्मश्री डॉ. मिलिंद कांबळे हे संस्थापक अध्यक्ष असलेली दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स आणि इंडस्ट्री (डिक्की) ही संस्था देखील आघाडीवर आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांचा लॉकडाऊन देशभर लागू केला. तथापि, राज्य शासनाने त्यापूर्वीच दोन-तीन दिवस अगोदर शाळा, महाविद्यालये, मॉल, थियटर बंद केली, त्यामुळे लॉकडाऊन सारखीच परिस्थिती निर्माण झाली होती. राज्यातील बेघर, हातावर पोट असणारे नागरिक अन्नापासून वंचित राहता कामा नये, यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच प्रशासनातील अधिका-यांनी उपाय योजण्यास सुरुवात केली. त्याचाच एक भाग म्हणून पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर आणि जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी विविध सामाजिक संस्था, दानशूर व्यक्तिंना मदतीसाठी आवाहन केले. या आवाहनास प्रतिसाद म्हणून दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स ॲण्ड इंडस्ट्रीचे (डिक्की) अध्यक्ष पद्मश्री डॉ. मिलिंद कांबळे आणि त्यांच्या सहका-यांनी विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांची भेट घेतली आणि त्यांच्या आवाहनानुसार पुणे शहरातील 7 निवारागृहातील बेघर नागरिकांच्या सकाळचा नाष्टा, दुपारचे भोजन आणि रात्रीच्या जेवणाची व्यवस्था करण्याची तयारी दर्शवली. जिल्हा प्रशासनाकडून भोजन वितरणाची पहिली परवानगी डीक्कीला मिळाली, हे विशेष !
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या स्वयंपाकगृहात सुमारे 2100 लोकांच्या जेवणाची तयारी गेल्या 28 मार्चपासून करण्यात येत आहे. पुणे महानगरपालिकेच्या आयुक्त शेखर गायकवाड व त्यांच्या अधिका-यांच्या मदतीने हे तयार भोजन आणि नाष्टा वितरीत करण्यात येत आहे.
  येरवड्यातील मदर तेरेसा समाज मंदिर, क्रांतीवीर लहूजी वस्ताद शाळा, साळवे इ लर्निंग स्कूल, तसेच नानासाहेब परुळेकर स्कूल (विश्रांतवाडी) आणि वडगाव शेरीतील आचार्य आनंदऋषी शाळा, लोकमान्य टिळक प्राथमिक विद्यालय येथे नाष्टा आणि दोन वेळचे भोजन वितरित केले जाते. या कामी डिक्कीतील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योजकांचा 40 जणांचा गट सहकार्य करत आहे. त्यामध्ये राजेश बाहेती, अनिल ओव्हाळे, राजू साळवे, अमित अवचरे, महेश राठी, कौस्तुभ ओव्हाळे, राजू वाघमारे, मैत्रयी कांबळे आणि सीमा कांबळे यांचा प्रमुख सहभाग आहे.
  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 129 व्या जयंतीचे औचित्य साधून 2100 खास स्वीट डिशेस देण्यात आल्याचे डिक्कीचे अध्यक्ष मिलिंद कांबळे यांनी सांगितले. याशिवाय 129 वस्त्यांतील 1129 कुटुंबांना तांदूळ, गव्हाचे पीठ, मसाला, मीठ, दाळ यांचा समावेश असलेला शिधा (4 माणसांच्या कुटुंबाला आठ दिवस पुरेल इतका) वितरित करण्यात येणार आहे.
डिक्की ही संघटना 14 एप्रिल 2005 रोजी स्थापना करण्यात आली. प्रत्येक राज्यात तिच्या शाखा आहेत. याशिवाय 7 देशातही ही संघटना पोहोचली आहे. सुमारे एक लाखांहून अधिक उद्योजक या संघटनेचे सदस्य आहेत. सामाजिक बांधिलकी म्हणून बेघर व्यक्तींच्या दोन वेळच्या भोजनाची जबाबदारी आम्ही उचलली असल्याचे कांबळे यांनी सांगितले.
कोरोना च्या पार्श्वभूमीवर ससूनमधील कोरोना रुग्णांवर उपचार करणा-या डॉक्टर आणि इतर     कर्मचा-यांची राहण्याची व्यवस्था बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या वस्तीगृहात करण्यात आली होती. रुग्णांची संख्या वाढत असल्याने त्यांची सोय जुन्या शासकीय विश्रामगृहात (आय बी) करण्यात आली आहे. येथे सुमारे 40 जण राहत आहेत. यांच्याही भोजनाची जबाबदारी डीक्कीने उचलली आहे. याशिवाय अत्यावश्यक सेवेतील पोलीस कर्मचारी व इतरांच्याही भोजनाची व्यवस्था करण्यात येत आहे.

भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त,, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून मंत्रालयात अभिवादन

Lok hitay news..






मुंबई लोक हिताय न्यूज. प्र.   दि. 14 :- भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी  मंत्रालयात डॉ. बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी मंत्रालयीन अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही  डॉ. बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करुन वंदन केलं. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्र्यांनी जनतेला घरातंच थांबून डिजीटल माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्याचं आवाहन केलं आहे. आज मंत्रालयातही  कोरोना अनुषंगानानं सुरक्षिततेची काळजी घेऊनच हा अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

Monday, 13 April 2020

त्रिरत्न बौद्ध महासंघ भारत एक नम्र निवेदन परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती समारोह 2020,, आदरणीय धम्मचारी यशोसागर यांनी मनोगत व्यक्त केले

Lok hitay news








.दि 13.एप्रिल... लोक हिताय न्यूज.......
.
 सभी भाईयों तथा बहनोंको मैत्रीपूर्ण जयभीम ! तथा आप सभी को 14 अप्रैल  प.पु. बोधीसत्त्व डा. बाबासाहब आंबेडकर जयंती 2020 की हार्दिक शुभकामनाएं !

हम सभी लोग हरवर्ष कि तरह इस वर्षभी हमारे प्रेरणास्रोत, उर्जास्थान डा. बाबासाहेब अांबेडकरजी के जयंती का जश्न बडे हर्षोल्हास के साथ मनाने की तैयारी कर रहे होगे.
पुरे जगत में तथा हमारे देश में जो कोरोना विशाणु संक्रमण की स्थीती निर्माण हुई है ऐसे हालातोमें  वर्तमान परिस्थिती में हमें कुछ सावधानी बरतनी होगी. ताकी हम, हमारा परिवार, समाज तथा देश सुरक्षित रहे. इसलीये इसबार हमें कुछ अलग तरह से जयंती मनानी होगी, अपने घर पर ही अपने परिवार  के साथ.

1) 13 अप्रैल को रात 12 बजे किसीभी प्रकारकी आतिशबाजी करने के के लिए सड़क पर न जाएं, ना ही कोई शाती मार्च (कॅन्डल मार्च) निकाले, किसीभी प्रकार से विहार, समाज भवन, पंचशील या निले ध्वज के पास इकठ्ठा होना टालीये.
2) अपने घर के लिए आवश्यक सजावट सामग्री प्राप्त करने के लिए बाजार में न जाये, घर के बाहर निकलना टालीये.
3) उपलब्ध परिस्थितियों में सजावट और पूजास्थान अपने घरोंमें बनाएं
४) बाबा साहेब को श्रद्धा सुमन अर्पित करने के लिए स्थानीय लोगों का जमाव ना बनायें. किसी भी प्रकार का सामुहीक आयाेजन ना करें. सभी प्रकार का सामुहीक आयोजन, भोजन टालें.
5) त्रिरत्न बौद्ध महासंघ, भारत कि आेरसे *आॅनलाइन* पर दिनभर विभीन्न कार्यक्रमोंका आयोजन किया गया है, इसमे आप आपके परिवार के साथ हिस्स लें.
6) फेसबुक, झुम ऐप, यूट्यूब जैसे विभिन्न, TV  जैसे मीडिया का उपयोग करते हुए घर पर रहते हुए खुशी और उत्साह के साथ अपनी जयंती मनाएं.
7) व्यक्तिगत ताैरपर तथा आप के परिवार के साथ आप घर में मिलकर पूजास्थान बनाये, ध्यान साधना ( मैत्री भावना) पूजा-सत्तपठन, गीत, किताबों का वाचन, प्रवचन सुनना,चिंतन, मीलकर अच्छा भोजन करें, दान का पालन करें, जो लोग जरुरतमंद है उन्हें सहयोग करें.अपना शारीरिक एवं मानसिक स्वास्थ्य बनाये सखे.

आप सभी घर में रहें, सुरक्षित रहें, स्वस्थ रहें, प्रेरीत रहे.
ऐसी मनोकामना ! भवतु सब्बमंगलं !

आपके विनित तथा हितैशी
*त्रिरत्न बौध्द महासंघ, भारत*.

Sunday, 12 April 2020

केंद्र सरकार सीएसआर फ़ंडावरून घाणेरडे राजकारण करत आहे.. अपारदर्शक पीएम केअर निधी बंद करा.... सिटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष. डॉ कराड

Lok hitay news..





नाशिक. (लोक हिताय न्यूज. प्र. शांताराम दूनबळे. ).दि. 12.एप्रिल..  केंद्र सरकारच्या कंपनी व्यवहार मंत्रालयाने मुख्यमंत्री निधीला दिलेला निधी सीएसआर फंड म्हणून मान्य केला जाणार नाही,फक्त पीएम केअर किंवा पंतप्रधान रिलीफ फंडाला दिलेला निधीच सीएसआर फंड म्हणून मानला जाईल असं जाहीर केलं  आहे .अनेक राज्यांमध्ये राज्यातील जनतेच्या तातडीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री निधी जमा केला जातो व त्याचा उपयोग राज्यातील अडचणीत असलेल्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी केला जातो. केंद्र सरकारच्या कंपनी व्यवहार मंत्रालयाच्या खुलाशा मुळे  कंपन्यांनी मुख्यमंत्री निधीत सी एस आर फंड देऊ नये व केंद्रातील  पीएमओ केअर किंवा पंतप्रधान निधीलाच द्यावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे .यावरून केंद्रातील भाजपचं सरकार हे आपत्तीच्या काळात सुद्धा घाणेरडे राजकारण करताना दिसून येतआहे .महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त उद्योग  आहेत. बड्या कंपन्या, बहुराष्ट्रीय कंपन्यांची मुख्य कार्यालय मुंबईत पुण्यामध्ये आहेत. या कंपन्या निश्चितपणे मुख्यमंत्री दिला सीएसआर फंड देण्यासाठी प्राधान्य देतात परंतु केंद्र सरकारच्या या फतव्यामुळे या कंपन्यांवर पीएम केरलाच निधी दिला पाहिजे यासाठी दबाव आणला जात आहे. केंद्र सरकारची भूमिका राज्य सरकारांच्या बाबतीमध्ये भेदभाव करणारी व त्यांच्यावर अन्याय करणारी आहे तसेच आपल्या घटनेतील संघराज्याच्या कल्पनेला तडा देणारी आहे.आणि म्हणून हा निर्णय बदलला पाहिजे असे मागणी सीटू युनियनच्या वतीने करण्यात येत आहे ..
तसेच पी एम केअर फंड रद्द करावा ,त्याची गरज नाहीये कारण पंतप्रधान रिलीफ फंड अगोदरपासूनच सुरू आहे. त्यामुळे पीएम केअर च्या नावाखाली निधी गोळा करून पंतप्रधान स्वतःची प्रतिमा अधिक उजळ करण्यासाठी आणि स्वतःचे सरकारचे अपयश झाकण्यासाठी त्याचा वापर करतील तसेच पीएम केअर फंड हा माहिती अधिकाराच्या कक्षेत येणार नाहीये अशी सोय  पंतप्रधानांनी करून घेतली आहे .त्यामुळे पारदर्शकता नसलेला पीएम केअर  फंड रद्द करण्यात यावा अशी सीटू युनियन मागणी करीत आहे...


डॉ. डी एल कराड,
 राष्ट्रीय उपाध्यक्ष सिटू

नाशिक जिल्ह्यात लॉक डाऊन मध्ये भिकार्‍याचा मुर्त्यदेह भूकबळी शहरात प्रथम मृतदेह आढळला,, प्रतिनिधी शांताराम दुनबळे यांच्याकडून माहिती मिळाली

.Lok hitay news.




नाशिक. (लोक हिताय न्यूज. प्र. शांताराम दूनबळे) ..दि. 12. एप्रिल, कोरोना विषाणु ने जगात थैमान घातले असताना व देशात लाॅकङावुन सुरू असतानाच नाशिक शहरात गरीब, फुटपाथ वर रहाणारे भिकार्यावर उपासमारीची वेळ आली आहे त्यातच  नाशिक जिल्ह्यात पहिला भुकबळी गेल्याची घटना आज दुपारी एक वाजता नाशिक शहर भद्रकाली  पोलीस स्टेशनचे बीट मासॅल संजय गवारे हे पोटॅलीग करत असताना शहरातील भद्रकाली सिग्नंलजवळ अज्ञात इसमाचा मृतदेह आढळला  ह्या वेळीत्यांनी वरील माहिती भद्रकाली पोलीस स्टेशनला मिळताच पोलीस निरीक्षक  ङी जी ढोली यांनी तात्काळ घटनेची पाहणी करून पंचनामा करून अज्ञात मृतदेह  नाशिक जिल्हा रूग्णालयात    दाखल करण्यात आला आहे  .परिसरातील नागरिकांच्या सांगण्यावरून अज्ञात  इसम भिकारी असल्याचे माहिती मिळते आहे सदर इसमाला अन्न न मिळाल्याने मृत्यू झाल्याची चचाॅ  भद्रकाली परिसरात होत आहे

Saturday, 11 April 2020

भारतीय बौद्ध महासभा या मातृ संस्थेच्या केंद्रिच्या आदेशानुसार लॉक डाऊन च्या काळात गरीब गरजूंना मदतीचा हात देण्यात आले,, रामचंद्र असलकर

Lok hitay news.





     निगडी. (लोक हिताय न्यूज. )दिनांक 11/४/२०२०रोजी पारशी बौद्ध महासभा पिंपरी-चिंचवड शहर शाखेच्या वतीने केंद्राच्या आदेशानुसार आने गरीब व गरजूंना मदतीचा हात पुढे करण्यात यावी असा आदेश असताना भारतीय बौद्ध महासभा निगडी येथील काही कार्यकर्त्यांनी निगडी सेक्टर 22, या परिसरामध्ये अंध अपंग गरीब व गरजूंना जेवण वाटप करण्यात आले याप्रसंगी उपस्थित मान्यवरआयु.रामचंद्र आचलकर (कोषाध्यक्ष.  पिं.चिं शहर)
आयु,। मच्छिंद्र कदम   भारतीय बौद्ध महासभा पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष पर्यटन प्रचार प्रचार.आसू.सुखदेव कांबळे
से.नं22 डॉ बाबासाहेब आंबेडकर वसाहत निगडी या ठिकाणी
 आदरणीय भीमराव साहेब आंबेडकर यांनी सांगितल्या प्रमाणे या ठिकाणी अंध अपंग व गोरगरिबांना जवळ जवळ 100ते 150 लोकांना अन्नदानाचा कार्यक्रम घेतला त्यावेळी विशेष सहकार्य म्हणुन या वेळी उपस्थित असलेले रिपब्लिकन सेना झोपडपट्टी सेलचे अध्यक्ष राजु गायकवाड, भारीप मा संघटक प्रमुख भीमराव सुरवसे, बौद्धाचार्य संजय दुपारे, संजय वाघोदे, उमाकांत गायकवाड, अरुण रनदिवे.सुरवसे ताई. विमलताई प्रधान ह्या सर्व कार्यकर्ते यांनी खूप मेहनत घेतली व कार्यक्रम यशस्वी केला व या पुढे ही असेच भोजन दान करण्यात येईल असे म्हटले आहे. 

केंद्रीय पथकाकडून पुणे विभागातील कोरोना परिस्थितीचा आढाव, विभागीय आयुक्त डॉक्टर दीपक म्हैसेकर माहितीदेताना

Lok hitay news.
 




              
        पुणे,(लोक हिताय न्यूज. ) दि.11 : राज्यात कोरोना विषाणु बाधित रुग्ण संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. पुणे विभागातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय पथकाचा दोन दिवसीय दौरा पार पडला. दरम्यान विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय पथकाची बैठक पार पडली. यावेळी केंद्रीय आरोग्य विभागाचे अतिरिक्त महासंचालक तथा केंद्रीय पथकाचे अध्यक्ष डॉ.पी.के.सेन, राम मनोहर लोहीया (आर.एम.एल.) रुग्णालयाचे वैद्यकीय तज्ञ तथा पथकाचे सदस्य डॉ.रोहित बन्सल, सफदरजंग रुग्णालयाचे भुल तज्ज्ञ तथा सदस्य डॉ.सौरभ मित्र मुस्तफी, आरोग्य उपसंचालक डॉ.संजय देशमुख,सार्वजनिक आरोग्य विभागाचे राज्य सर्व्हेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप औटी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक नांदापूरकर,आदी उपस्थित होते.

            पुणे विभागात जिल्हानिहाय अद्यापपर्यंतचे कोरोना संशयित रुग्ण, बाधित रुग्णांची पार्श्वभूमी डॉ. म्हैसेकर यांनी विशद केली. तसेच कोरोना प्रतिबंधासाठी लॉकडाऊन कालावधीत प्रशासनाच्या वतीने करण्यात येणाऱ्या उपाययोजना, शासकीय व खाजगी रुग्णालयांमध्ये कोरोनाच्या अनुषंगाने करण्यात आलेली तयारीबाबत माहिती देवून आवश्यक असणारे पीपीई किट, औषध साठा आदी विषयांबाबत चर्चा केली.

            प्रशासन व आरोग्य विभागाच्या वतीने सुरु असणाऱ्या उपाययोजनांबाबत केंद्रीय पथकाने समाधान व्यक्त केले. दरम्यान या समितीने बी.जे.वैद्यकीय महाविद्यालय(ससून रुग्णालय), नायडू रुग्णालय, जिल्हा रुग्णालय औंध, यशवंतराव चव्हाण रुग्णालय व टेस्टींग लॅब या ठिकाणी भेटी देवून पहाणी केली. तसेच आरोग्य विभाग पुणे व पिंपरी चिंचवडचे महानगरपालिका आयुक्त, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याशी चर्चा करुन जिल्हयाची कोरोना विषयक सद्यस्थिती जाणून घेतली.


Friday, 10 April 2020

वर्धमानपुरा सोसायटी कडून पंतप्रधान सहायता निधीस 5लाख 71 हजारांची मदत... विभागीय आयुक्त डॉ दीपक म्हैसेकर यांच्याकडे सोपवली यांच्याकडे सोपवली

Lok hitay news..






                                                     
        पुणे,(लोक हिताय न्यूज. प्र ) दि.10 : कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी पंतप्रधान सहायता निधीसाठी बिबवेवाडी येथील वर्धमानपुरा को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या वतीने 5 लाख 71 हजार रुपयांचा धनादेश विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
  कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी जिल्हयातील व्यापारी, सामाजिक संस्था, उद्योग तसेच दानशुर व्यक्तींनी पंतप्रधान सहायता निधी व मुख्यमंत्री सहायता निधीस मदत करण्याच्या डॉ. म्हैसेकर यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत वर्धमानपुरा सोसायटीने ही मदत केली. यावेळस सोसायटीचे अध्यक्ष संजय शिंगवी, सचिव महावीर मांडोत, खजिनदार अमित मुनोत, जितो संस्थेचे उपाध्यक्ष अशोक हिंगड, अभय बोरा, विजय ठक्कर, आनंद दर्शन युवा मंचचे अध्यक्ष महेंद्र सुंदेचा मुथा, उद्योजक नितीन नहार यावेळी उपस्थित होते.

मालेगाव तालुक्यातील प्रत्येक कुटुंबाच्या संरक्षणासाठी चारशे पथके... जिल्हाधिकारी सुरज मांढरे

Lok hitay news.





मालेगाव. (लोक हिताय न्यूज. प्र. शांताराम दूनबळे)  :दि. 10. ‘कोरोना’ सारख्या जीवघेण्या विषाणूने मालेगाव शहरात प्रवेश केला असून एकाच वेळी पाच कोरोना बाधीत रुग्ण आढळून येणे ही अतिशय गंभीर बाब आहे. यावर तातडीची उपाययोजना करण्यासाठी 400 पथके तयार करून संपुर्ण तालुक्यातील प्रत्येक कुटुंबाचे सर्व्हेक्षण करण्याचे निर्देश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी दिले.

शासकीय विश्रामगृह मालेगाव येथे सर्व विभाग प्रमुखांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते, यावेळी राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे, उपमहापौर निलेश आहेर, अपर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत, महानगरपालिकेचे आयुक्त किशोर बोर्डे, उपायुक्त नितीन कापडणीस, अपर पोलीस अधिक्षक संदिप घुगे, उपविभागीय अधिकारी विजयानंद शर्मा, तहसिलदार चंद्रजित राजपूत, सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.किशोर डांगे, आरोग्य अधिकारी डॉ.सपना ठाकरे माजी आमदार आसिफ शेख यांच्यासह प्रशासनातील सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.

यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी श्री.मांढरे म्हणाले, वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ, शिक्षक व शासकीय कर्मचारी प्रत्येकी एक अशा तीन कर्मचाऱ्यांचे एक पथक या प्रमाणे 400 पथके प्रत्येक नागरिकांचे सर्व्हेक्षणाचे काम करणार असून ज्यांना लक्षणे दिसून येतील त्यांच्यावर तात्काळ वैद्यकीय उपचारासाठी दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नागरिकांनी देखील या सर्व पथकांना सहकार्य करण्याचे आवाहन करत, जिल्हाधिकारी श्री.मांढरे म्हणाले, ‘कोरोना’ विषाणू हा मालेगावकरांच्या दारात येऊन ठेपला आहे, येणारे आठ दिवस अतिमहत्वाचे आहेत, म्हणून प्रत्येक नागरिकाने काळजी घेण्याची विनंतीही त्यांनी यावेळी केली.

मालेगाव मधील प्रकार हा सामुहिक संसर्गाचा प्रथमदर्शनी दिसून येत असल्याचे सांगत जिल्हाधिकारी श्री.मांढरे म्हणाले, प्रशासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या उपाययोजना प्रभावीपणे व कडक स्वरुपात आता यापुढे राबविण्यात येणार आहेत. संपुर्ण तालुक्यातील परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कंट्रोल रुमची तात्काळ स्थापना करावी, स्वस्त धान्य दुकानात नागरिकांची गर्दी होऊ नये म्हणून धान्य वितरणाचे सुयोग्य नियोजन करावे, भाजीपाला वितरणासाठी मोजक्या हातगाड्यांना परवाने देवून घरपोच भाजीपाला पोहचवावा, मदतीसाठी पुढे येणाऱ्या स्वयंसेवी संस्थांची यादी तयार करून मिळणारी सर्व मदत एका छताखाली आणून प्रशासनामार्फत गरजू पर्यंत पोहचविण्याचे सुक्ष्म नियोजन करावे, अशा सुचनाही जिल्हाधिकारी श्री.मांढरे यांनी यावेळी दिल्या.

पुढे बोलतांना जिल्हाधिकारी श्री.मांढरे म्हणाले मालेगावातील पाचही कोरोना बाधीत रुग्णांचा निवासी परिसर सिलबंद करण्यात आला आहे. त्यांना झालेल्या संसर्गाची माहिती मिळविण्यासाठी युध्दपातळीवर काम सुरू आहे. या पाचही कोरोना बाधीत रुग्णांना कुठलीही प्रवाशी पार्श्वभुमी दिसून येत नसल्यामुळे प्रशासनापुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे. यासाठी कोम्बिंग ऑपरेशनही राबविण्यात येणार आहे. या पाच रुग्णांपैकी एका रुग्णाचा मृत्यू झाला असून उर्वरित चारही बाधीत रुग्णांमुळे अधिक रुग्ण बाधित होतील ही शक्यता लक्षात घेवून एक खाजगी रुग्णालय पुर्णपणे क्वारांटाईन हॉस्पीटल म्हणून अधिग्रहीत करण्यात आले आहे. त्याठिकाणी या चारही बाधीत रुग्णांना पुढील उपचारासाठी स्थलांतरीत करण्यात येणार आहे. नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घेणे अत्यंत गरजेचे असून कुणीही घराबाहेर पडू नये यासाठी संचारबंदीची मुदत वाढविण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे म्हणाले, नागरिकांनी घराबाहेर पडू नये, आपल्या दारापर्यंत रेशन, भाजीपाला, आरोग्य सुविधा पोहचविण्यासाठी प्रशासनामार्फत आवश्यक त्या उपाययोजना तयार करण्यात येत असून नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे. तर धान्य वितरण व्यवस्थेमध्ये कुचराई, साठेबाजी करणाऱ्यांसह प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर आता फौजदारी स्वरुपाची कारवाई करण्याचे निर्देश मंत्री श्री.भुसे यांनी यावेळी दिले. तसेच आपत्ती काळात मदतीसाठी सेवाभावी संस्थांनी पुढे येवून मदतीचे आवाहनही त्यांनी केले.

यानंतर मंत्री दादाजी भुसे, जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांच्यासह डॉक्टर व प्रशासनातील अधिकाऱ्यांनी सामान्य रुग्णालयास भेट दिली. याठिकाणी उपस्थित सर्व डॉक्टर व नर्सिंग स्टाफचे मनोबल वाढविण्यासाठी जिल्हाधिकारी श्री.मांढरे म्हणाले, आपण केवळ सेवा बजावत नसून आपली ही खरी देशभक्ती असल्याचे सांगून त्यांना प्रोत्साहित केले. तर मंत्री श्री.भुसे यांनी आरोग्य प्रशासनाचा आढावा घेतला. शहराबाहेर असलेल्या जीवन हॉस्पीटलची पाहणी करत तेथे उपलब्ध असलेल्या सोयी सुविधांची देखील त्यांनी माहिती जाणून घेतले

Thursday, 9 April 2020

मुंबई नाशिक हायवे लागूनच असलेला पॉईंटवर घंटागाडी व पोलीस व्हॅन चा अपघाता मधून सर्वजण सुखरूप,,

    Lok hitay news  .










लोक हिताय न्यूज  (  नाशिक जिल्हा प्रतिनिधी शांताराम दुनबळे.. )दि.  9  . नाशिक शहरात गरवारे पाॅईटंवर घंटागाङी व दहशतवादी विरोधी पथक गाङी यांच्यात समोरासमोर धङक होवुन पोलीसासह घंटागाङी चालक जखमी झाले आहेत  .याबाबत सविस्तर माहिती अशी की गरवारे पाॅईटंवर मुंबई  नाशिक हायवेला लागुन असलेल्या कचरा ङेपोतुन घंटागाङी  क्रमांक एम,एच,१५एफ क्यू ०३२७ ही विरूध्द दिशेने येत असताना समोरून येणारी पोलीस व्हॅन क्रमांक एम,एच,१५ए,ए,४१३१ यांच्यात समोरासमोर धङक होवुन अबंङ पोलीस निरीक्षक सुभाष देशमुख, वाहनचालक शेख, पोलीस हवालदार नाङे,कङवे,गंभीर जखमी झाले असून घंटा गाङी चालक सुनिल पाईकराव जखमी झाला असुन त्यांना  जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे   आय पीसी गुन्हा रजिस्टर्ड २८७नुसार   मोटार वाहन कायदा अॅतगत ३३७,४२७,१८४,१७९,११९,१७७, नुसार  कारवाई करण्यात आली आहे पोलीस निरीक्षक चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे अमलदार श्री  कातकाङे अधिक तपास करत आहेत

कोरोना या विषाणूजन्य महामारी पासून मुक्त्ती मिळण्यासाठी पिंपळगाव करांचाही उस्फुर्त प्रतिसाद... निफाड. प्र. मनोहर देसले. यांनी माहिती दिली




.लोक हिताय न्यूज.






Lok hitay news. (नाशिक जिल्हा प्रतिनिधी शांताराम दूनबळे.)

दि. 9. एप्रिल, कोरोना या विषाणूजन्य महामारी पासून मुक्ती मिळण्यासाठी पिंपळगाव करांचाही उस्फुर्त प्रतिसाद*.......
       नाशिक जिल्ह्यात दुसरा कोरोना ग्रस्त संशयित रुग्ण आढळल्यामुळे दक्षता म्हणून प्रशासनाने दिनांक:८,९,११,१२ ,व १४या दिवशी पिंपळगाव संपूर्ण बंद केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज रोजी दि:-८ एप्रिल २०२० या दिवशी आमचे प्रतिनिधी यांनी फेरफटका मारला असता संपूर्ण गावात स्मशान शांतता दिसून आली.गावातील सर्व रस्ते पोलीस विभागांनी सील केलेले आढळले. एप्रिल महिन्याच्या एवढ्या कडकडीत उन्हात पोलीस  अधिकारी व  त्यांचे कर्मचारी शिस्तबद्धपणे आपले कर्तव्य बजावत होते.निफाड फाटा ,चिंचखेड चौफूली व उंबरखेड चौफूली ही ठिकाणेतर खूपच वर्दळीची आहेत मात्र आज काही वेगळेच चित्र दिसून आले.या सर्व परीसराचा विचार करता शहरातील जनतेनेही चांगला प्रतिसाद दिला.
    तसेच  निफाड तालुक्याचे मा.आमदार दिलीप काका बनकर यांनी  तालुक्यातील तहसीलदार ,प्रांत व जिल्हा आरोग्य अधिकारी व पोलीस अधिकारी यांच्या सहकार्याने व पिंपळगाव मेडीकल असोशिएशन मार्फत व मार्केट कमिटी अशा सर्वांच्या माध्यमातून भिमाशंकर या शैक्षणिक संकुलात  कोरोना ओपीडीची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या ठिकाणी पिंपळगाव बसवंत येथील सर्व डॉक्टर  आपली सेवा विनामूल्य देत असून त्यांना देखील रुग्ण तपासणी साठी स्वतंत्र कक्ष दिले आहेत .प्रत्येक रुग्णांना अतिशय चांगल्या प्रकारे सेवा पुरवली जात आहे. मार्केट मधील कर्मचाऱ्यांना योग्य असे प्रशिक्षण दिले असल्याने ते देखील योग्य काळजी घेत आहेत.

Wednesday, 8 April 2020

नाशिक जिल्ह्यातील निर्भिड प्रतिनिधी महेश दारुंटे येवला गोरख पवार समर्थक येवला भागातील गरजू व्यक्तींची भूक भागवताना

लोक हिताय न्यूज





येवला. Lok hitay news. Nashik. (प्र. शांताराम दून बळे. ).दि. 9 एप्रिल, देशात लॉकडाऊन असल्यामुळे अनेक गोर गरीब तसेच हातावरील प्रपंच असणाऱ्या व्यक्तींना पैसे येणे बंद झाल्याने त्याच्यावरती उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. हे गोरख पवार समर्थक यांनी लक्ष्यात घेऊन येवला शहरातील समर्थक एकत्र येऊन गरिबांना एक हात मदतीचा म्हणून भोजनाची व्यवस्था केली आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन आहे. त्यामुळे कष्टकरी मजुरांना पोटाची खळगी भरण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे गोरगरिबाना जेवण मिळावे म्हणून समर्थक पुढे आले असून लॉकडाऊन पूर्णपणे संपत नाही तोपर्यंत जेवण देणार आहे. याकरिता भोजन वाटप व्यवस्था ही गाडेकर ऑटो या परिसरात केली आहे. दररोज सायंकाळी सात ते नऊ या वेळेत भेजनाची वाटप केली जाते. दररोज किमान अडीचशे ते तीनशे गरजूंना भोजन वाटप केले जाते. लॉकडाऊन असेपर्यंत ही भोजनाची व्यवस्था राहणार असल्याची माहिती गोरख पवार समर्थक यांनी दिली. यासाठी सर्वच समर्थक येवला परिश्रम घेत आहेत.

नाशिक परिसरातील हा परिसर आजपासून 14 दिवस पालिका प्रशासनाकडून सील.. आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी माहिती दिली

Lok hitay news..







(लोक हिताय न्यूज. प्र. शांताराम  दूनबळे.)                     नाशिक शहरातच दि. 8..मनोहरनगर,गोविंदनगर,या परिसरात वास्तवास असलेला व्यक्ती कोवीङ 19बाधित असल्याने ह्या रूग्णाचे निवासस्थान असलेला परिसर व त्याच परिसरात जिल्हा पालकमंत्री,  छगन भुजबळ यांचे ही निवासस्थान ह्याच परिसरात असल्याने तीन किलो मीटरचा परिसर आजपासून सील करण्यात आला असल्याची माहिती महानगरपालिका प्रशासनाने दिली. पालिका प्रशासनाकङुन कठोर उपाययोजना केल्या जात असुन आजाराच्या उद्रेकावर नियञंण  मिळविण्याची रणनीती आखण्यात आली आहे. दरम्यान नाशिक महानगरपालिकेच्या  जाकीर हुसेन रूग्णालयात कोरोना बाधित रूग्ण चार तारखेला भरती करण्यात आला असता त्याचाच अहवाल पॉझिटीव्ह जिल्हा रूग्णालयात आला आहे त्याचेच निवासस्थान मनोहरनगर गोविंद नगर असल्याने नाशिक केंद्र स्थानी ठेवून तीन किलो मीटर परिसरात १४दिवसासाठी प्रतिबंधीक क्षेञ म्हणून महापालिका प्रशासन यांनी घोषित केले आहे. त्या नुसार प्रतिबंधात्मक क्षेत्रातील व्यक्ती घर सोडून बाहेर येवू शकणार नाही. बाहेरून आलेली व्यक्ती ला ह्या क्षेत्रात जाऊ शकणार नाही त्याचप्रमाणे टु व्हिलर ,फोर व्हिलर पुणॅपणे बंदी घालण्यात आली आहे. सदर आदेशाचे नागरिकांनी पालन न केल्यास अथवा उल्लंघन केल्यास साथरोग  १८९७आय पी सी अॅतगत आपत्ती व्यवस्थापन कायदा अन्वये कठोर कारवाई करण्यात येईल असे आदेश महानगरपालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिले आहे

Tuesday, 7 April 2020

चिखली ग्रामस्थ व एक गाव एक शिवजयंती उस्तव समितीच्यावतीने अन्नदान दानशूर व्यक्ती व संस्था आणि मदत करण्याची चिखली ग्रम स्थानाचे आव्हान

Lok hitay news.





पिंपरी (लोक हिताय न्यूज.)  (7 एप्रिल 2020) : जगभर पसरलेल्या कोरोनामुळे भारतात मागील 13 दिवसापासून लॉकडाऊन करण्यात आले आहे. 22 मार्च रोजी झालेल्या जनता कर्फ्यूपासून गोरगरीबांचे उत्पन्न बंद झाले आहे. त्याची झळ उद्योगनगरीतील नागरिकांनादेखील बसत आहे. हातावर पोट असणारे गरीब नागरिक, लॉकडाऊनमुळे रस्त्यावरच थांबलेले ट्रकचालक, क्लिनर, बांधकाम साईटवरील मजूर, चिखली परिसरातील छोट्या-मोठ्या उद्योगातील असंघटीत कामगार तसेच चिखलीतील धर्मराजनगर, इंदिरानगर झोपडपट्टी, केशवनगर आणि भाजीमंडई पत्राशेड या परिसरातील शेकडो कुटुंबांची उपासमार होत आहे. त्यांना किमान एकवेळचे जेवण मिळावे या सामाजिक भावनेतून श्री क्षेत्र टाळगाव चिखलीतील ‘एक गाव एक शिवजयंती उत्सव समिती’ तसेच ‘श्री दत्तगुरु सेवामंडळ व समस्त ग्रामस्थ श्री क्षेत्र टाळगाव चिखली’तील नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने एकत्र येऊन अन्नदान सुरु केले आहे. चिखली गावठाणातील दत्तमंदिर येथे 27 मार्च रोजी सुरु केलेल्या या अन्नदानात पहिल्या दिवशी 200 नागरिकांना जेवणाचे पॅकेट देण्यात आले. रोज हा आकडा वाढत असून सोमवारी 2200 नागरिकांना अन्नदान करण्यात आले.
गावातील तरूण कार्यकर्त्यांनी व ज्येष्ठ नागरिकांनी सोशल मिडियातून व्हॉट्सअपग्रुपवर अन्नदान करण्याची कल्पना मांडली. यानंतर ग्रामस्थांनी मदतीचे आवाहन केले. यामध्ये अनेक युवक स्वयंस्फूर्तीने सहभागी झाले आणि दत्तमंदिरातील शेडमध्ये अन्नधान्य जमण्यास सुरुवात झाली. यामध्ये तांदूळ, रवा, पीठ, तेल डबे, साखर, भाजीपाला, मसाले असे जिन्नस जमा झाले. सकाळी 9 वाजता तयारीला सुरुवात होऊन सायंकाळी 6 नंतर दत्तमंदिरात अन्नदान करण्यात येते. तसेच चिखलीतील धर्मराजनगर, इंदिरानगर झोपडपट्टी, केशवनगर आणि भाजीमंडई पत्राशेड या परिसरातील नागरिकांना जागेवर जाऊन जेवण देण्यात येते. ज्या कुटुंबांनी जेवण मिळण्याबाबत मागणी केली आहे अशा कुटुंबांला स्वयंसेवक भेट देऊन येतात. त्यांना मदतीची गरज असल्याची खात्री झाल्यानंतर कुटुंब प्रमुखाला शक्य असल्यास दत्त मंदिरात पॅकेट देण्यात येते अन्यथा घरपोच जेवण देण्याची सुविधादेखील ग्रामस्थांनी केली आहे. या पॅकेटमध्ये मसाले भात, शिरा, पुरीभाजी देण्यात येते. बचत गटातील महिलांनी पुढे येऊन मदत केली तर बुधवारपासून चपाती व बुंदी देण्याचेही नियोजन आहे. हे अन्नदान लॉकडाऊन संपेपर्यंत सुरु ठेवण्याची चिखली ग्रामस्थांची इच्छा आहे. परंतू दिवसेंदिवस गरजूंची संख्या वाढत आहे व शिधा कमी पडत आहे. दानशूर व्यक्तींनी व संस्थांनी या अन्नदानात मदत करण्याचे आवाहन चिखली ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे. इच्छुक दात्यांनी चिखली गावठाणातील दत्तमंदिर येथे शिधा आणून द्यावा असेही आवाहन करण्यात आले आहे.
---

Monday, 6 April 2020

आपले शहर आपली जबाबदारी समजून 11व्या दिवस सातशे गरजू कुटूंबातील नागरिकांस अन्नधान्याचे वाटप.. हमीद भाई शेख

Lok hitay news.





पिंपरी. (लोक हिताय न्यूज. प्र. )दि. 6. कोरोनो या रोगावर नियंत्रण ठेवयासाठी केंद्र व राज्य सरकार प्रयत्नशील आहे.डाँक्टर ,नर्स ,पोलीस,प्रशासन अनेकजन मेहनत घेत आहेत.२१ दिवस लाँकडाउन आहे.यारम्यान कष्टकरी, गरीब,कामगार लोकांचे दैनंदीन खान्यापिण्याचे हाल होत आहेत. अनेक गोर -गरीब ,कष्टकरी ,कामगार याना दररोज  घर चालवण्याची  चिंता सतावत आहे. *अशा परिस्थितीमध्ये  याचे सामाजीक भान ठेवून व अशा बिकट  परिस्थितीमध्ये आपल्या गरजू बांधवाना आधार देण्यासाठी अपना वतनचे पिंपरी चिंचवड शहर कार्याध्यक्ष हमीद शेख, हिंजवडीमधील आयटी कंपनीचे गौरव अगरवाल सर,माधवी जैन मँडम* यांनी वाकड,म्हातोबानगर ,थेरगाव पडवलनगर , रहाटणी ,अण्णाभाउ साठेनगर , दळवीनगर ,रावेत ,काळा खडक,वेताळनगर ,चिंचवडेनगर ,घरकुल परिसरातील गरजू नागरीकांना रेशनींगचे कीट वाटप केले.यामध्ये तांदूळ ५ किलो ,गव्हाचे पीठ २ किलो ,मीठ १ किलो ,१ मिरची पाकीट , तेल १ किलो , डाळ २ किलो व पालेभाज्यांचा समावेश आहे.
हे रेशनिंग किट घरोघरी जाऊन , तसेच सोशल डिस्टन्स चे भान ठेऊन वाटप करण्यात येत आहे. आमची भारताचे एक जबाबदार नागरिक म्हणून आम्ही आमची जबाबदारी पार पडत आहोत. यासाठी रियाज शेख ,शाकीर शेख ,राज गुंजाळ यांसह अनेक कार्यकर्ते मेहनत घेत आहे

राज्यपालांनी साधला विभागीय जिल्हाअधिकाऱ्यांशी संवाद पुणे विभागाने कोरोनासाठी केलेल्या उपाययोनांबाबत केले समाधान व्यक्त..

Lok hitay news..





पुणे लोक हिताय न्यूज.. 6- कोरोनाविरुध्दच्या लढयात राज्यातील प्रशासकीय यंत्रणा खूप चांगले  काम करीत असून प्रशासकीय यंत्रणेबरोबरच अन्य स्वयंसेवी संस्थांनाही सहभागी करुन घ्यावे असे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सांगितले.
विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्याशी राज्यपालांनी राजभवन मुंबई येथून व्हिडिओ कॉन्फरन्सींगद्वारे संवाद साधत कोरोना विषाणूला प्रतिबंध घालण्यासाठी केलेल्या उपाययोजना, मदत कार्य यांचा यावेळी त्यांनी आढावा घेत मार्गदर्शन केले.
राज्यपाल म्हणाले, कोरोना संसर्ग वाढू नये म्हणून प्रशासन, पोलिसदल, आरोग्य विभाग, एनजीओ तसेच अनेक सामाजिक संस्था हिरिरीने काम करत आहेत. राज्यातील ज्येष्ठ नागरिक, कामगार, मजूर यांच्यापर्यंत मदतकार्य पोहचवण्याबरोबरच बेघर, बेरोजगारांच्या समस्यांचाही जलद निपटारा करावा. या सर्व घटकांना अन्न, निवारा, याबरोबरच औषधोपचार अशा सुविधा वेळेवर पोहचवाव्यात. सफाई कर्मचाऱ्यांची या परिस्थितीत मोठी भूमिका आहे. डॉक्टर्स, नर्सेस,पोलिस, सफाई कर्मचारी यांचा उत्साह वाढवण्याची गरज आहे. त्यांना अधिक प्रोत्साहित करावे, अशा सूचनाही यावेळी राज्यपालांनी दिल्या.
पुणे विभागात कोरोना विषाणूच्या  प्रतिबंधासाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांनी दिली. सद्यस्थितीची माहिती देताना डॉ. म्हैसेकर म्हणाले, पुणे विभागात आज अखेर एकूण 2450 बाधितांचे सॅम्पल्स घेतले. यापैकी 149 जण पॉझिटिव्ह व 2146 जण निगेटिव्ह आढळले आहेत. यापैकी 26 जण बरे होवून घरी गेले आहेत. मृत्यूंची संख्या 6 इतकी आहे. आजअखेर विभागातील एकूण 2444 संशयित व्यक्तींना रुग्णालयात दाखल केले होते. त्यापैकी 2150 व्यक्तींना सोडले असून 292 व्यक्ती अद्याप रुग्णालयात उपचार घेत आहेत. विभागातील दाखल झालेल्या 85 हजार 340 प्रवाशांपैकी 36 हजार 070 प्रवाशांचा फॉलोअप पूर्ण झाला असून अजून 49 हजार 270 प्रवासी शिल्लक आहेत.
पुणे विभागात एकूण 21 कोरोना चाचणी सुविधा केंद्रे आहेत. विभागातील खाजगी, शासकीय हॉस्पिटलसाठी पीपीई कीट पुरवण्यासठी व्यवस्था केली असून हाफकीन संस्थेमार्फत या कीटची तपासणी व खात्री केली जात आहे. कामगार, मजूर, बेघर यांच्या सद्यस्थितीबद्दल सांगताना डॉ. म्हैसेकर म्हणाले, पुणे विभागात मजूर स्थलांतरित कामगार व बेघर यांच्यासाठी कायमस्वरुपी 61 कॅम्प असून त्याची क्षमता 4360 व्यक्तींसाठी आहे. तर खाजगी कॅम्प 505 असून त्यामध्ये 26585 व्यक्तींची क्षमता आहे. असे विभागांतर्गत एकूण 566 कॅम्प असून त्याची क्षमता 30 हजार 945 इतकी आहे. कामगार, मजूर यांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. विभागातील साखर कारखान्यांच्यावतीने अन्न पुरविले जात आहे. इतर राज्यातील एकूण 246 व्यक्ती विभागात अडकलेल्या असून जिल्हा स्तरावरुन  त्याबाबत योग्य ती कार्यवाही सुरु आहे. विभागातील शेतीची कापणीची, काढणीची कामे सुरु आहेत. लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांना शेतमालाच्या भावाबाबत  समस्या येवू नयेत यासाठी प्रयत्न सुरु आहेत. बाजार समिती मार्फत भाजीपाला व फळे यांची बाजारपेठ सुरु राहण्याबाबत कार्यवाही सुरु आहे. दूधाच्या मागणीत झालेली घट लक्षात घेता दूधापासून  पावडर बनवण्याचे प्रमाण 40 टक्क्याहून 80 टक्क्यांपर्यंत वाढवले आहे. सर्व बाजार समित्यांमध्ये कोरोना विषाणू संसर्ग व प्रादूर्भाव टाळण्यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहे. भाजीपाल्याची आवक सुरळीत असून धान्याचा साठा पुरेसा असून तुटवडा नसल्याचे त्यांनी सांगितले.
दिल्ली मरकजवरुन परत आलेल्या व्यक्तींबद्दल माहिती देताना डॉ. म्हैसेकर म्हणाले, पुणे विभागात सध्या एकूण 661 व्यक्ती असून त्यापैकी 299  व्यक्तींना क्वारंटाईन केले आहे. 49 व्यक्ती या महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यात असून 205 व्यक्ती महाराष्ट्राबाहेर अन्य राज्यांमध्ये आहेत. अजून 107 व्यक्तींचा शोध सुरु आहे. विभागातील सर्व जिल्ह्यांमध्ये 9 स्वयंसेवी संस्था, एनजीओ कार्यरत असून रिलीफ कॅम्प मधील व्यक्तींना 330 एनजीओ जेवणाची व्यवस्था पुरवित आहेत. लष्कराच्या सदर्न कमांडच्या सुविधा  राखून ठेवण्यात आल्या आहेत. जैविक कचऱ्याच्या योग्य निर्मूलनासाठी उपाययोजना केल्या असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी जिल्हाधिकारी नवल किशोर राम  यांनी पुणे जिल्ह्यातील कोरोना बाबतची सद्यस्थिती व उपाययोजनांची राज्यपालांना विस्तृत माहिती दिली. ते म्हणाले, कोरोनाचा प्रादुर्भाव  रोखण्यासाठी जिल्ह्यातील सर्व यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यरत आहेत. भविष्यात बाधित रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता गृहित धरुन उपाययोजना केल्या जात आहेत. आयसोलेशन व आयसीयू व्यवस्थेमध्ये वाढ करण्यात येत आहे. डॉक्टर्स व स्टाफची पुरेशी संख्या असून त्यांना आवश्यक सुविधा, साहित्य पुरविण्यात येत आहे. सर्वसामान्यांना लॉकडाऊनमुळे त्रास होवू नये, यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. जिल्ह्यातील कामगारांच्या कॅम्पमध्ये असलेल्या कामगार, मजूर वर्गाला जेवण देण्यासाठी कामगार विभागाने व्यवस्था केली आहे. कामगारांचे स्थलांतर न होण्याबाबत दक्षता घेतली  जात आहे. जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी कामगारांच्या जेवणाची व्यवस्था केली असून 145  एनजीओ मार्फत 1 लाख 15 हजार व्यक्तींना जेवण उपलब्ध करुन देण्यात आले आहे. शिधापत्रिका नसलेल्यांसाठी सामाजिक संस्था, एनजीओ तर्फे  भोजन व्यवस्था केली आहे.  कोणतीही व्यक्ती उपाशी राहणार नाही याची खबरदारी घेण्यात येत आहे. नागरिकांना दूध, भाजीपाला  अन्नधान्य यांचा सुरळीत पुरवठा होण्यासाठी व्यवस्था करण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी राम यांनी सांगितले.

कोरोना प्रतिबंधासाठी सव्वा तीन लाख पीपीई किट्स मास्क व्हेटीलेटसरची. केंद्र शासनाकडे मागणी.. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची माहिती महाराष्ट्र आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची माहिती

Lok hitay news.





मुंबई,(लोक हिताय न्यूज ) दि. ६: कोरोनाच्या प्रतिबंधासाठी राज्यामध्ये पुरेशा प्रमाणात साधनसामुग्री उपलब्ध आहे. मात्र आपत्कालिन स्थिती ओढावल्यास खबरदारीचा उपाय म्हणून केंद्र शासनाकडे सव्वा तीन लाख पीपीई कीटस्, नऊ लाख एन ९५ मास्क आणि  ९९ लाख ट्रिपल लेअर मास्कची मागणी करण्यात आली आहे. हे साहित्य तातडीने मिळावे यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे सांगितले.
या साहित्याची मागणी केंद्र शासनाकडे केली असली तर राज्यात या साहित्याची खरेदी करण्याकरिता आवश्यक ती तयारी करावी, असे निर्देशही विभागाचे सचिव आणि आयुक्तांना दिल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
कोरोना प्रतिबंधासाठी लागणारे साहित्य राज्यांनी त्यांच्या स्तरावर खरेदी करू नये केंद्र शासनाकडून त्याचा पुरवठा करण्यात येईल, अशा आशयाचे पत्र केंद्र शासनाकडून राज्यांना पाठविण्यात आले आहे.
सध्या राज्यात शासकीय आरोग्य यंत्रणेकडे ३५ हजार पीपीई कीटस्, तीन लाखाच्या आसपास एन ९५ मास्क, २० लाख ट्रीपल लेअर मास्क, १३०० व्हेंटीलेटर्स उपलब्ध आहेत. खबरदारीची उपाययोजना म्हणून केंद्र शासनाकडे यासर्व साहित्यांची मागणी नोंदविण्यात आली आहे.
राज्याच याचा तुटवडा जाणवू नये यासाठी या साहित्याची खरेदी करण्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्याबाबत राज्याच्या आरोग्य सचिवांना निर्देश दिल्याचे आोग्यमंत्र्यांनी सांगितले.

Sunday, 5 April 2020

भारतीय रेल्वेमार्फत कोरोना बाधित रुग्नासाठी तयार करण्यात येत असलेल्या कोचमधील आयसोलेशन वार्डची.... विभागीय आयुक्त डॉक्टर दीपक म्हैसेकर यांनी पाहणी केली

Lok hitay news.






पुणे,(लोक हिताय न्यूज. प्र. ) दि.5: भारतीय रेल्वेमार्फत  पूर्वतयारी म्हणून  कोरोना बाधित रुग्णांसाठी आयसोलेशन कंपार्टमेन्ट वार्ड तयार केले जात आहेत.
     पुण्यातील घोरपडी येथील कोच रिपेअर डेपो येथे कोचमध्ये साईसुविधा तयार करण्याचे काम गतीने सुरू आहे, आज
विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी आयसोलेशन सुविधेची प्रत्यक्ष पाहणी करुन रेल्वेच्या तयारीचा आढावा घेतला.
यावेळी वरिष्ठ मंडल यांत्रिक अभियंता विजयसिंग धडस, कोचिंग डेपो अधिकारी राहुल गर्ग आदी  उपस्थित होते. 
विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर म्हणाले, भारतीय रेल्वेच्या माध्यमातून कोवीड-19 रुग्णांसाठी आयसोलेशन कंपार्टमेंट वॉर्ड तयार करण्याचे काम सुरू आहे. प्रत्येक बोगीत 16 ते 18 रुग्णांची व्यवस्था करण्याचे नियोजन आहे. पुणे विभागात पहिल्या टप्प्यात 50 कोच पुरविण्यात येणार आहे. यामध्ये 800 ते 900 रुग्णांची व्यवस्था होऊ शकेल.रेल्वेने या सुविधेत रुग्णांना सुविधा देण्याच्या दृष्टीने आवश्यक बदल केले असून येत्या दोन दिवसात दोन कोच उपलब्ध होतील, उर्वरित कोच आठ दिवसात उपलब्ध होतील, असेही सांगून रेल्वेने निर्माण केलेल्या कोच सुविधेबाबत डॉ. म्हैसेकर यांनी समाधान व्यक्त केले. 

संस्था आणि दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी पुढे येण्याचे आव्हान..... विभागीय आयुक्त दा डॉक्टर दीपक मासेकर

Lok hitay news.






पुणे, (लोक हिताय न्यूज )दि.५ : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येने लोक ठिकठिकाणी अडकलेले आहेत. त्यांना मदतीसाठी  साहित्याची गरज आहे. तेव्हा संस्था आणि दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन मदत करावी, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी केले आहे.
       डॉक्टर्स रात्रंदिवस काम करीत आहेत. त्यांच्यासाठी एन 95 व सर्जिकल मास्क तसेच त्या अनुषंगीक साहित्याची गरज आहे, त्याचप्रमाणे अडकलेल्या मजुरांसाठी अन्नधान्याची सुध्दा आवश्यकता आहे. त्यासाठी उद्योजक, व्यापारी संघटना, सेवाभावी संस्था आदीं दानशूर व्यक्तींनी पुढे येण्याची गरज आहे. साहित्य स्वरुपात ही मदत करावी,  ही मदत करतांना सोशल डिस्टन्स ठेवण्‍यात यावा तसेच मदत द्यायला जास्त लोकांनी येवू नये, तीन-चार लोकांनीच यावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
मुख्यमंत्री सहायता निधीत https://cmrf.maharashtra.gov.in/CMRFCitizen/index.action या वेबसाईटवरुनही मदत  करता येईल, असे आवाहनही करण्यात आले आहे.