Friday, 24 April 2020

लॉक डाऊन च्या काळामध्ये व्यसनापायी वन वन फिरतात पाई पाई, दारू तंबाखू सिगरेट बीडयासाठी,.. नाशिक

. Lok hitay news....





(नाशिक .दि. 24.एप्रिल.  (लोक हिताय न्यूज. प्रतिनिधी )शांताराम दुनबळे.  )   लॉक डाऊन च्या काळामध्ये कुणी गायछाप देता का गायछाप , असे म्हणण्याची वेळ तंबाखू शौकिनांवर आली असून १० रुपयांची गायछाप ४० रुपये म्हणजे मूळ किमतीच्या चक्क तिप्पट रक्कम देऊनही मिळत नसल्याने गायछाप शौकिनांच्या जिवाची घालमेल सुरू आहे . तर गायछाप इतकी महाग झाल्याने कुणी एक विडाही द्यायला तयार नसल्याने खऱ्या अर्थाने गायछापची किंमत शौकिनांना कळू लागली आहे . गायछाप सोबतच दारूच्या किंमतीही आभाळाला भिडल्याने अनेकांनी दारूचा नादच सोडून दिला आहे . लॉकडाऊन अगोदर गायछाप सह तंबाखूचे इतर प्रकारांची पुडी १० ला मिळत होती , तर बियरचा एक खंबा ६५० ला मिळत होता . मात्र आता सर्वत्र लॉकडाऊन असल्याने गुटखा तंबाखू अन दारूच्या आहारी गेलेल्यांची सद्यस्थितीत तगमग होत आहे . त्यामुळे कितीही महाग असली तरी पाहिजे म्हणजे पाहिजे या पवित्र्याने मिळेल तिथून या वस्तूंची शोधाशोध तळीरामाकडून होतांना दिसत आहे . त्यातच टंचाई निर्माण झाल्याने दहा रुपयाची गायछाप तंबाखू ४० रुपयांपर्यंत ६५० रुपयांचा व्हिस्कीचा खंबा १८०० रुपयांपर्यंत दराने विक्री होत असूनही मोठी मागणीअसल्याचे चित्र आहे . लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवा दुकाने सुरू असल्याने चोरून विकल्या जाणाऱ्या देशी दारू व विदेशी मद्यांचे दर तिपटी चौपटी पर्यंत पोहोचले आहेत . सिगारेट , गुटखा व तंबाखू यांचीही काळ्या बाजारात चढ्या दराने विक्री होत आहे . आता लॉकडाऊनचा कालावधी वाढल्याने तळीरामांच्या जीवाची घालमेल वाढली आहे . आता तर एकच प्याल्यासाठी तळीराम आसुसले आहेत . आर्थिकदृष्ट्या सशक्षम असलेल्यांनी लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या काही दिवसांतच मद्यासह तंबाखूचा पुरेसा साठा करून ठेवला पण आता तोही आटोपला असून ज्यांचे हातावर पोट आहे किंवा अर्थप्राप्ती बेताची आहे , अशा तळीरामांची घालमेल वाढलीआहे . अनेकजण तर एखादी तरी बाटली मिळते का , याचा शोध दिवसभर युद्धपातळीवर घेत आहेत . अनेक विक्रेत्यानी शिल्लक साठ्याचा ताळमेळ साधला असून काळजीपूर्वक विक्री केली जाते . ग्रामीण भागातील दुकानदार तर नियमित ग्राहकांनाच विक्री करत आहेत तर ज्यांना कुठेच मिळत नाही ते मूहमागें दर देत आहेत . गुटखा व सिगारेट शिवाय अनेकांना जेवणही जात नसल्याने विशिष्ट अड्ड्यांवर त्याची सर्रास तिप्पट दराने विक्री होत आहे . अशीच स्थिती तंबाखूची ही असून या भागात लोकप्रिय असलेल्या गायछाप तंबाखूचे दर तर विक्रमी वाढले आहेत . अशा स्थितीतही या व्यसनांसाठी शेकडो रुपये खर्च होत असून त्यातून लाखो रुपयांची उलाढाल होताना दिसतेय .

No comments:

Post a Comment