Lok hitay news.
पुणे,(लोक हिताय न्यूज. प्र. ) दि.४: भारती हॉस्पिटलमधील कोरोना उपाययोजनांसंदर्भात तयार करण्यात आलेल्या विलगीकरण कक्षाची तसेच पॉझिटीव्ह रुग्णांकरीता तयार करण्यात आलेल्या विशेष कक्षाची विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी प्रत्यक्ष पाहणी करुन रुग्णालयातील तयारीचा आढावा घेतला.
यावेळी पीएमआरडीएचे आयुक्त विक्रमकुमार,भारती हॉस्पिटलचे वैद्यकिय अधिष्ठाताडॉ. संजय ललवाणी, आयसीयू विभागाचे प्रमुख डॉ.शिवकुमार अय्यर यांच्यासह ररूग्णालयातील प्रमुख डॉक्टर उपस्थित होते.
विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांनी रुग्णालयातील उपलब्ध साधन सामुग्रीचा आढावा घेतला तसेच वैदयकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या अडचणीसंदर्भात त्यांच्याशी चर्चा केली. तसेच रुग्णालयातील एकूण क्षमता,आयसीयूमध्ये असलेल्या सोई सुविधा आदी तयारीबाबत समाधान व्यक्त केले.

No comments:
Post a Comment