Wednesday, 8 April 2020

नाशिक जिल्ह्यातील निर्भिड प्रतिनिधी महेश दारुंटे येवला गोरख पवार समर्थक येवला भागातील गरजू व्यक्तींची भूक भागवताना

लोक हिताय न्यूज





येवला. Lok hitay news. Nashik. (प्र. शांताराम दून बळे. ).दि. 9 एप्रिल, देशात लॉकडाऊन असल्यामुळे अनेक गोर गरीब तसेच हातावरील प्रपंच असणाऱ्या व्यक्तींना पैसे येणे बंद झाल्याने त्याच्यावरती उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. हे गोरख पवार समर्थक यांनी लक्ष्यात घेऊन येवला शहरातील समर्थक एकत्र येऊन गरिबांना एक हात मदतीचा म्हणून भोजनाची व्यवस्था केली आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन आहे. त्यामुळे कष्टकरी मजुरांना पोटाची खळगी भरण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे गोरगरिबाना जेवण मिळावे म्हणून समर्थक पुढे आले असून लॉकडाऊन पूर्णपणे संपत नाही तोपर्यंत जेवण देणार आहे. याकरिता भोजन वाटप व्यवस्था ही गाडेकर ऑटो या परिसरात केली आहे. दररोज सायंकाळी सात ते नऊ या वेळेत भेजनाची वाटप केली जाते. दररोज किमान अडीचशे ते तीनशे गरजूंना भोजन वाटप केले जाते. लॉकडाऊन असेपर्यंत ही भोजनाची व्यवस्था राहणार असल्याची माहिती गोरख पवार समर्थक यांनी दिली. यासाठी सर्वच समर्थक येवला परिश्रम घेत आहेत.

No comments:

Post a Comment