Lok hitay news
नाशिक, लोक हिताय न्यूज. प्र. शांताराम दूनबळे..दि. २० एप्रिल: शहरातील सिडको नवीन नाशिक परिसरातील शिवशक्तीनगर भागात प्रभाग २६ येथे स्वस्त धान्य दुकान येथे नागरिकांना मोफत धान्य वाटप चालू असताना त्या ठिकाणी नगरसेविका भाजपच्या अलका आहिरे उपस्थित होत्या.
स्वस्त धान्य हे शासनाच्या अंत्योदय, केशरी, बीपीएलच्या योजनातुन मिळत असताना लोकप्रतिनिधी उपस्थित रहात असल्याने दैनिक सकाळचे प्रतिनिधी प्रमोद दङंगव्हाळ यांनी “आयजीच्या जीवावर बायजी उदार” या मथळ्याखाली सोशल मिङीया वर वृत्त प्रसिद्ध केले हे वृत्त शहरात व्हायरल झाल्याने नगरसेविका पती भाजपाचे जबाबदार पदाधिकारी कैलास आहिरे यांनी पञकार प्रमोद दङंगव्हाळ यांना शिवीगाळ व ठार मारण्याची धमकी दिली व सिडको परिसरात दिसला तर तुला बघतो अशी धमकी दिली.
हा प्रकार घडल्या नंतर पञकार दङंगव्हाळ यांनी अबंङ पोलीस स्टेशन ला तक्रार दाखल केली. यावेळी नाशिक पोलीस आयुक्त विश्वास नागरे पाटील यांनी पोलीस स्टेशनला भेट देऊन त्याच्या आदेशानुसार अबंङ पोलीस उप आयुक्त विजय खरात व सहायक पोलिस आयुक्त मंगलसिग सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली अबंङ वरीष्ठ पोलीस निरीक्षक कुमार चौधरी यांनी पञकार संरक्षण कायदान्वे गुन्हा दाखल करण्यातआला असुन भा द वी पञकार सरंक्षण कायदा कलम ५०७ नुसार अटक करण्यात आली आहे. यावेळी दैनिक् लक्ष प्रतिनिधी शेगावकर, महाराष्ट्र राज्य पञकार संघ जिल्हा अध्यक्ष लक्ष्मण ङोळस, भारतीय पञकार महासंघ जिल्हा अध्यक्ष अभि पगारे, शोधांश पञकार ङाॅ राजेश साळुंके, आवाज न्युज रिपोर्टर भारतीय पञकार महासंघ नाशिक शहर अध्यक्ष शांताराम दुनबळे, सह सिडको परिसरातील पञकार प्रतिनिधी उपस्थित होते.
यावेळी या घडलेल्या घटनेचा जाहीर निषेध करून कोणत्याही राजकीय क्षेत्रातील लोकप्रतिनिधी पदाधिकारी यांनी पञकार, वाताॅहर,सोशल मिङीया पञकार, याना दमबाजी, धमकी दिल्यास अशा लोकांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी उपस्थित पञकार यांनी केली
No comments:
Post a Comment