Monday, 6 April 2020

आपले शहर आपली जबाबदारी समजून 11व्या दिवस सातशे गरजू कुटूंबातील नागरिकांस अन्नधान्याचे वाटप.. हमीद भाई शेख

Lok hitay news.





पिंपरी. (लोक हिताय न्यूज. प्र. )दि. 6. कोरोनो या रोगावर नियंत्रण ठेवयासाठी केंद्र व राज्य सरकार प्रयत्नशील आहे.डाँक्टर ,नर्स ,पोलीस,प्रशासन अनेकजन मेहनत घेत आहेत.२१ दिवस लाँकडाउन आहे.यारम्यान कष्टकरी, गरीब,कामगार लोकांचे दैनंदीन खान्यापिण्याचे हाल होत आहेत. अनेक गोर -गरीब ,कष्टकरी ,कामगार याना दररोज  घर चालवण्याची  चिंता सतावत आहे. *अशा परिस्थितीमध्ये  याचे सामाजीक भान ठेवून व अशा बिकट  परिस्थितीमध्ये आपल्या गरजू बांधवाना आधार देण्यासाठी अपना वतनचे पिंपरी चिंचवड शहर कार्याध्यक्ष हमीद शेख, हिंजवडीमधील आयटी कंपनीचे गौरव अगरवाल सर,माधवी जैन मँडम* यांनी वाकड,म्हातोबानगर ,थेरगाव पडवलनगर , रहाटणी ,अण्णाभाउ साठेनगर , दळवीनगर ,रावेत ,काळा खडक,वेताळनगर ,चिंचवडेनगर ,घरकुल परिसरातील गरजू नागरीकांना रेशनींगचे कीट वाटप केले.यामध्ये तांदूळ ५ किलो ,गव्हाचे पीठ २ किलो ,मीठ १ किलो ,१ मिरची पाकीट , तेल १ किलो , डाळ २ किलो व पालेभाज्यांचा समावेश आहे.
हे रेशनिंग किट घरोघरी जाऊन , तसेच सोशल डिस्टन्स चे भान ठेऊन वाटप करण्यात येत आहे. आमची भारताचे एक जबाबदार नागरिक म्हणून आम्ही आमची जबाबदारी पार पडत आहोत. यासाठी रियाज शेख ,शाकीर शेख ,राज गुंजाळ यांसह अनेक कार्यकर्ते मेहनत घेत आहे

No comments:

Post a Comment