Lok hitay news.
पुणे, (लोक हिताय न्यूज )दि.५ : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येने लोक ठिकठिकाणी अडकलेले आहेत. त्यांना मदतीसाठी साहित्याची गरज आहे. तेव्हा संस्था आणि दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन मदत करावी, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी केले आहे.
डॉक्टर्स रात्रंदिवस काम करीत आहेत. त्यांच्यासाठी एन 95 व सर्जिकल मास्क तसेच त्या अनुषंगीक साहित्याची गरज आहे, त्याचप्रमाणे अडकलेल्या मजुरांसाठी अन्नधान्याची सुध्दा आवश्यकता आहे. त्यासाठी उद्योजक, व्यापारी संघटना, सेवाभावी संस्था आदीं दानशूर व्यक्तींनी पुढे येण्याची गरज आहे. साहित्य स्वरुपात ही मदत करावी, ही मदत करतांना सोशल डिस्टन्स ठेवण्यात यावा तसेच मदत द्यायला जास्त लोकांनी येवू नये, तीन-चार लोकांनीच यावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
मुख्यमंत्री सहायता निधीत https://cmrf.maharashtra.gov.in/CMRFCitizen/index.action या वेबसाईटवरुनही मदत करता येईल, असे आवाहनही करण्यात आले आहे.

No comments:
Post a Comment