Sunday 26 April 2020

नाशिक मनपा कडून पंचनाम. नुकसान भरपाई बाबत आज निर्णय आगीत 110.घरे भसमसत 650नागरिक बेघर झाले आहे








.
Lok hitay news..








,         नाशिक.. लोक हिताय न्यूज.  जिल्हा प्र.शांताराम दूनबळे , दि.. 27. एप्रिल..  भद्रकाली परिसरात भिमवाङी झोपडपट्टीत शनिवारी सकाळी लागलेल्या आगीतील नुकसानीचे पंचनामे तातडीने पुणॅ करण्यात आले असून या आगीत ११०घरे भस्मसात झाले आहेत तर जवळपास ६५०नागरिक बेघर झाले असल्याची माहिती समोर आली आहे. या सवाॅना नुकसान भरपाई देण्याबाबत आज दिनांक २७ रोजी निणॅय घेतला जाणार असल्याचे मनपा  सुञाकङुन समजली आहे.                             दरम्यान आपदग्रस्तांना तातडीने आथिॅक मदत देण्याची मागणी शेतकरी कामगार पक्षाचे अॅङव्होकेट मनिष बस्ते  भारतीय कम्युनिस्ट पक्ष  राजू देसले,  सी आय टी यु कामगार संघटना कामगार नेते ङाॅ ङी एल कराङ  राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे अण्णासाहेब कटारे, पिपल्स रिपब्लिकन पक्षाचे गणेश ऊन्हवणे, काॅगेस पक्षाचे लक्ष्मण जायभावे, समाजसेवक देवाभाऊ वाघमारे, भिमा आव्हाङ, संकल्पित रिपाई प्रकाश पगारे, सह विविध स्तरावरील राजकिय सामाजिक कार्यकर्ते यांनी केली आहे.                                         गंजमाळ भद्रकाली परिसरात भिमवाङी हा परिसर मध्यवर्ती   वस्तीतील रहिवासी भाग असुन दाट वस्तीच्या  हया भागात शनिवारी सकाळी  सिलिंडर गॅस गळती ने आग लागली. अनेक घरात सिलिंडरचे स्फोट झाले त्यामुळे परिसरात एकच धावपळ उडाली  .महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रयत्नांची शिकस्त करून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले माञ तरीही अनेक घरे भस्मसात झाली तर साडेसहाशे नागरिक बेघर झाले आहे.              एका पाठोपाठ सिलिंडरचे स्फोट झाल्यानंतर देखील जीवितहानी झाली नाही ही ह्या दुर्घटनेत सुदैवाची बाब ठरली आहे. दरम्यान , आगीच्या घटनेनंतर महापालिकेने संबंधित विस्थापित नागरिकांची जवळच्याच बी . डी . भालेकर मैदान आणि मनपा शाळा क्रमांक सहामध्ये व्यवस्था केली . याशिवाय रविवारची सुटी असल्याने शनिवारीच घाईघाईने सर्व पंचनामे उरकण्यात आले . त्यानुसार ११ घरे आगीच्या भक्ष्यस्थानी पडले असून , ६५० नागरिक बेघर झाल्याचा ' अहवाल सायंकाळी तयार करण्यात आला आहे . जिल्हाधिकारी कार्यालयाशी चर्चा करून या नागरिकांना तातडीने आर्थिक मदत मिळावी यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे महापालिका आयुक्तांनी सांगितले.

No comments:

Post a Comment