Lok hitay news.
पुणे. लोक हिताय न्युज. दि. 2.एप्रिल.
जगभर मृत्यूचे थैमान घालणारा कोरोनाव्हायरस चा प्रादुर्भाव अधिक वाढल्याने संपूर्ण देशभरात संचारबंदी कायदा लागू करण्यात आला असून या 21 दिवसाच्या लॉकडाऊन कालावधी मुळे गोरगरीब जनतेला अनंत हालअपेष्टांना सामोरे जावे लागत आहे. ही परिस्थिती सुधारण्यासाठी राज्य सरकार व केंद्र सरकार जिकिरीचे प्रयत्न करीत आहेत.
माननीय महोदय या जिकिरीच्या कालावधीमध्ये उदरनिर्वाह चालवण्यासाठी किमान रेशनिंग वरील शिधा उपलब्ध व्हावा अशी अपेक्षा राज्यातल्या मोठ्या घटकांकडून व्यक्त होत आहे. व ती रस्ता असल्याने त्याबाबत आपण देखील गंभीरतेने विचार करत आहोत असे मला वाटते.
गरजू व गोरगरीब जनतेला शासकीय धान्य व शिधा शिधापत्रिकेच्या आधारावरच आपण आजवर देत आहोत. परंतु सद्यस्थितीमध्ये यामध्ये काही अंशी बदल करून शिधापत्रिका नसणाऱ्या गरजवंताला देखील शासकीय धान्य व शिधा उपलब्ध करून देणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे. त्यामुळे अशा शिधापत्रिका नसणाऱ्या परंतु गरजू व्यक्तींना, कुटुंबांना शासकीय धान्य देण्यासाठी आपण खास निर्णय घेऊन त्यांना धान्य द्यायला हवे.
शिधापत्रिका नसलेल्या गरजू व्यक्तींचे
अ) आधार कार्ड ,मजूर म्हणून शासकीय, निमशासकीय व अशासकीय नोंदीचा पुरावा.
ब) असंघटित क्षेत्रात काम करत असल्याचे शासकीय ,निमशासकीय व शासकीय नो नसल्याचा पुराव्याची नोंद.
ग्राह्य धरून त्यांना सदर धान्याचे वाटप करण्यात यावे अशी विनंती आम्ही आपणास या निवेदनाद्वारे करीत आहोत.

No comments:
Post a Comment