Monday 20 April 2020

आदित्य बिर्ला हॉस्पिटल कडून अडीच लाख रुपये माफ करून तब्बल आठ तासानंतर मृतदेह ताब्यात घेतला,, उमेश चव्हाण यांच्या संघर्षातून

Lok hitay news






 चिंचवड -(लोक हिताय न्यूज. प्र).   दि. १९ एप्रिल २०२०- लॉकडाऊनचा काळ - कोरोनाचं थैमान* मार्केट बंद पैसे आणायचे कुठून?? पैसे देणार कोण ??
श्रीमंत दशरथ जाधव, वय - ५६, रा. निगडी यांचं रविवारी १९ एप्रिल २०२० रोजी दीर्घ आजाराने चिंचवड जवळील थेरगाव येथील आदित्य बिर्ला हॉस्पिटलमध्ये सकाळी ९ वाजता निधन झालं..  ३ दिवस उपचारांचं  बिल होतं २ लाख ७२ हजार रुपये. बँक बॅलन्स नाही. जवळील मित्रांकडे पैसे नाहीत. वडील गेल्याच्या दुःखाने आभाळ फाटलं होतं आणि अडीच लाख रुपये बिल बघून पायाखालची जमीन सरकली होती. त्यात लॉकडाऊनच्या नियमामुळे नातेवाईक येऊ शकत नाहीत. सोन्या चांदीची दुकाने उघडी असती तरी दागिने तरी असायला हवेत ना ? पैसे जमवण्याचा कोणताच पर्याय नाही. अश्या परिस्थितीत निगडितील संतोष धंदर हा युवक कार्यकर्ता मला सातत्याने फोन करत होता. मित्राचे वडील वारले आहेत. अडीच लाख रुपये भरल्याशिवाय डेडबॉडी देतच नाहीत, हे सांगत होता. आपल्या रुग्ण हक्क परिषदेच्या कार्यकर्त्याना तरी तिथे कसे पाठवावे? सद्यस्थितीत पुणे - पिंपरी चिंचवड मध्ये घरी बसेल त्याचंच भलं आहे, अशी परिस्थिती! दुपारी १ वाजता त्याचा अकरावा फोन आल्यावर त्याला म्हटलं मी येतो काळजी करू नका! आणि गर्दीही करू नका... घरातून गाडी काढली. मी आणि ऍड. वैशालीताई चांदणे निघालो सोबत पियुषला घेतलं.... हॉस्पिटलमध्ये एकही निर्णय घेणारा अधिकारी नाही म्हणून अर्धा तास गेला... या काळात सह-धर्मादाय आयुक्त श्री नवनाथ जगताप आणि सहाय्यक पोलीस आयुक्त श्री. श्रीधर जाधव यांना फोनवर परिस्थिती सांगितली. तोपर्यंत रुग्ण हक्क परिषदेचे स्वतः उमेश चव्हाण आणि ऍड. वैशाली चांदणे आदित्य बिर्ला हॉस्पिटलमध्ये आल्याची बातमी चांगलीच पसरली होती.
    चक्रे वेगाने फिरली तेथील पुनीतकुमार हे अधिकारी रविवार सुट्टी असताना तातडीने उपस्थित झाले. आणि अडीच लाख रुपयांचे बिल माफ करून लगेचच डिस्चार्ज कार्ड बनवून मृतदेह ताब्यात दिला. मृतकाच्या कुटुंबातील लोकांना अश्रू अनावर झालेच होते. रडता रडता म्हणाले साहेब सगळ्यांना फोन केले. पोरं निवडणुकीत ज्याच्या मागे फिरले त्यांना फोन केले. नातेवाईकांना - नगरसेवकांना सर्वांना फोन केले. कुणीच आलं नाही. सगळे म्हणत होते घराबाहेर पडता येत नाही, येता येत नाही म्हणून....
      तुम्हाला खूप आशीर्वाद लागतील ! शर्टाच्या कॉलरने - तळहातानेडोळ्यांच्या कडा पुसतनाही हात जोडून ते लोक ऍम्ब्युलन्सकडे वळाले. तेथील सामाजिक कार्यकर्ता संतोष धंदरने झालेल्या मदतीविषयी आभाराचे पत्र देऊन फोटो काढण्याची विनंती केली.... रुग्ण हक्क परिषदेचे सगळेच कार्यकर्ते क्रियाशील आहेत.मात्र लॉकडाउनमुळे थेट हॉस्पिटलमध्ये जाऊन मदत करणं मला गेल्या दिडवर्षात जमलंच नव्हतं!! आशीर्वादाची कमाई आणि पुण्याईचा संचय जमा करून पुण्याकडे गाडी वळवली.
     *- उमेश चव्हाण, अध्यक्ष - रुग्ण हक्क परिषद*

No comments:

Post a Comment