Lok hitay news.
मालेगाव. (लोक हिताय न्यूज. प्र. शांताराम दूनबळे) :दि. 10. ‘कोरोना’ सारख्या जीवघेण्या विषाणूने मालेगाव शहरात प्रवेश केला असून एकाच वेळी पाच कोरोना बाधीत रुग्ण आढळून येणे ही अतिशय गंभीर बाब आहे. यावर तातडीची उपाययोजना करण्यासाठी 400 पथके तयार करून संपुर्ण तालुक्यातील प्रत्येक कुटुंबाचे सर्व्हेक्षण करण्याचे निर्देश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी दिले.
शासकीय विश्रामगृह मालेगाव येथे सर्व विभाग प्रमुखांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते, यावेळी राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे, उपमहापौर निलेश आहेर, अपर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत, महानगरपालिकेचे आयुक्त किशोर बोर्डे, उपायुक्त नितीन कापडणीस, अपर पोलीस अधिक्षक संदिप घुगे, उपविभागीय अधिकारी विजयानंद शर्मा, तहसिलदार चंद्रजित राजपूत, सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.किशोर डांगे, आरोग्य अधिकारी डॉ.सपना ठाकरे माजी आमदार आसिफ शेख यांच्यासह प्रशासनातील सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.
यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी श्री.मांढरे म्हणाले, वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ, शिक्षक व शासकीय कर्मचारी प्रत्येकी एक अशा तीन कर्मचाऱ्यांचे एक पथक या प्रमाणे 400 पथके प्रत्येक नागरिकांचे सर्व्हेक्षणाचे काम करणार असून ज्यांना लक्षणे दिसून येतील त्यांच्यावर तात्काळ वैद्यकीय उपचारासाठी दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नागरिकांनी देखील या सर्व पथकांना सहकार्य करण्याचे आवाहन करत, जिल्हाधिकारी श्री.मांढरे म्हणाले, ‘कोरोना’ विषाणू हा मालेगावकरांच्या दारात येऊन ठेपला आहे, येणारे आठ दिवस अतिमहत्वाचे आहेत, म्हणून प्रत्येक नागरिकाने काळजी घेण्याची विनंतीही त्यांनी यावेळी केली.
मालेगाव मधील प्रकार हा सामुहिक संसर्गाचा प्रथमदर्शनी दिसून येत असल्याचे सांगत जिल्हाधिकारी श्री.मांढरे म्हणाले, प्रशासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या उपाययोजना प्रभावीपणे व कडक स्वरुपात आता यापुढे राबविण्यात येणार आहेत. संपुर्ण तालुक्यातील परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कंट्रोल रुमची तात्काळ स्थापना करावी, स्वस्त धान्य दुकानात नागरिकांची गर्दी होऊ नये म्हणून धान्य वितरणाचे सुयोग्य नियोजन करावे, भाजीपाला वितरणासाठी मोजक्या हातगाड्यांना परवाने देवून घरपोच भाजीपाला पोहचवावा, मदतीसाठी पुढे येणाऱ्या स्वयंसेवी संस्थांची यादी तयार करून मिळणारी सर्व मदत एका छताखाली आणून प्रशासनामार्फत गरजू पर्यंत पोहचविण्याचे सुक्ष्म नियोजन करावे, अशा सुचनाही जिल्हाधिकारी श्री.मांढरे यांनी यावेळी दिल्या.
पुढे बोलतांना जिल्हाधिकारी श्री.मांढरे म्हणाले मालेगावातील पाचही कोरोना बाधीत रुग्णांचा निवासी परिसर सिलबंद करण्यात आला आहे. त्यांना झालेल्या संसर्गाची माहिती मिळविण्यासाठी युध्दपातळीवर काम सुरू आहे. या पाचही कोरोना बाधीत रुग्णांना कुठलीही प्रवाशी पार्श्वभुमी दिसून येत नसल्यामुळे प्रशासनापुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे. यासाठी कोम्बिंग ऑपरेशनही राबविण्यात येणार आहे. या पाच रुग्णांपैकी एका रुग्णाचा मृत्यू झाला असून उर्वरित चारही बाधीत रुग्णांमुळे अधिक रुग्ण बाधित होतील ही शक्यता लक्षात घेवून एक खाजगी रुग्णालय पुर्णपणे क्वारांटाईन हॉस्पीटल म्हणून अधिग्रहीत करण्यात आले आहे. त्याठिकाणी या चारही बाधीत रुग्णांना पुढील उपचारासाठी स्थलांतरीत करण्यात येणार आहे. नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घेणे अत्यंत गरजेचे असून कुणीही घराबाहेर पडू नये यासाठी संचारबंदीची मुदत वाढविण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे म्हणाले, नागरिकांनी घराबाहेर पडू नये, आपल्या दारापर्यंत रेशन, भाजीपाला, आरोग्य सुविधा पोहचविण्यासाठी प्रशासनामार्फत आवश्यक त्या उपाययोजना तयार करण्यात येत असून नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे. तर धान्य वितरण व्यवस्थेमध्ये कुचराई, साठेबाजी करणाऱ्यांसह प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर आता फौजदारी स्वरुपाची कारवाई करण्याचे निर्देश मंत्री श्री.भुसे यांनी यावेळी दिले. तसेच आपत्ती काळात मदतीसाठी सेवाभावी संस्थांनी पुढे येवून मदतीचे आवाहनही त्यांनी केले.
यानंतर मंत्री दादाजी भुसे, जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांच्यासह डॉक्टर व प्रशासनातील अधिकाऱ्यांनी सामान्य रुग्णालयास भेट दिली. याठिकाणी उपस्थित सर्व डॉक्टर व नर्सिंग स्टाफचे मनोबल वाढविण्यासाठी जिल्हाधिकारी श्री.मांढरे म्हणाले, आपण केवळ सेवा बजावत नसून आपली ही खरी देशभक्ती असल्याचे सांगून त्यांना प्रोत्साहित केले. तर मंत्री श्री.भुसे यांनी आरोग्य प्रशासनाचा आढावा घेतला. शहराबाहेर असलेल्या जीवन हॉस्पीटलची पाहणी करत तेथे उपलब्ध असलेल्या सोयी सुविधांची देखील त्यांनी माहिती जाणून घेतले

No comments:
Post a Comment