.लोक हिताय न्यूज.
Lok hitay news. (नाशिक जिल्हा प्रतिनिधी शांताराम दूनबळे.)
दि. 9. एप्रिल, कोरोना या विषाणूजन्य महामारी पासून मुक्ती मिळण्यासाठी पिंपळगाव करांचाही उस्फुर्त प्रतिसाद*.......
नाशिक जिल्ह्यात दुसरा कोरोना ग्रस्त संशयित रुग्ण आढळल्यामुळे दक्षता म्हणून प्रशासनाने दिनांक:८,९,११,१२ ,व १४या दिवशी पिंपळगाव संपूर्ण बंद केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज रोजी दि:-८ एप्रिल २०२० या दिवशी आमचे प्रतिनिधी यांनी फेरफटका मारला असता संपूर्ण गावात स्मशान शांतता दिसून आली.गावातील सर्व रस्ते पोलीस विभागांनी सील केलेले आढळले. एप्रिल महिन्याच्या एवढ्या कडकडीत उन्हात पोलीस अधिकारी व त्यांचे कर्मचारी शिस्तबद्धपणे आपले कर्तव्य बजावत होते.निफाड फाटा ,चिंचखेड चौफूली व उंबरखेड चौफूली ही ठिकाणेतर खूपच वर्दळीची आहेत मात्र आज काही वेगळेच चित्र दिसून आले.या सर्व परीसराचा विचार करता शहरातील जनतेनेही चांगला प्रतिसाद दिला.
तसेच निफाड तालुक्याचे मा.आमदार दिलीप काका बनकर यांनी तालुक्यातील तहसीलदार ,प्रांत व जिल्हा आरोग्य अधिकारी व पोलीस अधिकारी यांच्या सहकार्याने व पिंपळगाव मेडीकल असोशिएशन मार्फत व मार्केट कमिटी अशा सर्वांच्या माध्यमातून भिमाशंकर या शैक्षणिक संकुलात कोरोना ओपीडीची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या ठिकाणी पिंपळगाव बसवंत येथील सर्व डॉक्टर आपली सेवा विनामूल्य देत असून त्यांना देखील रुग्ण तपासणी साठी स्वतंत्र कक्ष दिले आहेत .प्रत्येक रुग्णांना अतिशय चांगल्या प्रकारे सेवा पुरवली जात आहे. मार्केट मधील कर्मचाऱ्यांना योग्य असे प्रशिक्षण दिले असल्याने ते देखील योग्य काळजी घेत आहेत.
No comments:
Post a Comment