Sunday 26 April 2020

नाशिक शहरातील भीम वाडी गन्जमाळ येथील भीषणआगीत नुकसान झालेल्या कुंटुबीयांना त्वरित मदत करावी आरपीआय कडून... मा छगन भुजबळ यांच्या कडे मागणी

Lok hitay news..





नाशिक.. (लोक हिताय न्यूज. प्र. शांताराम दूनबुळे )*दि. 26.एप्रिल.. कोरोना महामारी च्या संकटाने एक महिन्यापासून संचारबंदी व जमाबंदी असल्याने सर्वच नागरिक आप आपल्या घरांमध्ये बंदिस्त आहेत*.
*नाशिक येथील गंजमाळ वस्तीतील भिमवाडीतील मजूरवर्ग घरीच असल्याने प्रचंड आर्थिक संकटात असतांना या ठीकाणी शनिवार २५ रोजी प्रचंड आग लागून शेकडो लोक बेघर झालेले आहेत.*
*त्यांच्या सर्व  संसारोपयोगी धस्तची राखरांगोळी झालेली आहे घरातील भांडी,कपडे ,अन्न, महत्वाचे कागदपत्रे, पैसे अडका जळुन खाक झाला आहे, महाराष्ट्र सरकारने या घटनेची त्वरित दखल घेऊन आगित होरपळणारया व नुकसान झालेल्या गोरगरिबांना महाराष्ट्र सरकार मार्फत * एका कुटुंबास 2 लाख रुपयांचे आर्थिक मदत देऊन कुटुंबास आधार द्यावा.अशी मागणी ईमेल व्दारे  रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया च्या वतीने जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पुरवठा मंत्री मा.ना. छगनरावजी भुजबळ साहेब यांचे कडे रिपाई चे राज्य उपाध्यक्ष मा. रविंद्रदादा जाधव, राष्ट्रीय उपाध्यक्ष मा.प्रियकीर्ती त्रिभुवन, उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष मा. वसंतरावां वाघ, ग्रा.जिल्हा अध्यक्ष मा.विनोदभाऊ जाधव, जिल्हा कार्याध्यक्ष मा.संजय गायकवाड, निफाड तालुका अध्यक्ष मा.महेंद्र साळवे, जिल्हा उपाध्यक्ष मा. प्रदीपनाना गांगुर्डे, तालुका कार्याध्यक्ष मा.  सुरेश डांगळे, तालुका नेते प्रमोद आहीरे, युवक ता.कार्याध्यक्ष मा. विनोद गायकवाड, तालुका सरचिटणीस मा.प्रमोद शिंदे, उत्तम जाधव, प्रकाश गांगुर्डे, राजु सोनवणे, शशीभाऊ जाधव, आदींनी केली आहे* .
"""""""""""""""""""""""""""""""""""""

No comments:

Post a Comment